देवळा / माळवाडी _ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _ नासिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गाव सुशोभित व आदर्श करणार असल्याची माहिती सरपंच शिवाजी बागुल व ग्रामसेवक एस.आर.देवरे यांनी ” महाराष्ट्र न्यूज “शी बोलताना दिली.पुढे त्यांनी सांगितले की शासनाच्या विविध योजना राबिण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून दलीत , आदिवासी वस्ती सुधार योजना तसेच शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना मिळून देणार,पंतप्रधान योजनेअंतर्गत बेघर असणाऱ्यांना घरकुल योजना लाभ मिळून देऊन माळवाडी गाव झोपडपट्टी मुक्त करणार असेही सरपंच बागुल व ग्रामसेवक देवरे यांनी यावेळी सांगितले तर गाव हरित,स्वच्छ करून आदर्श बनविण्याचे आमचे स्वप्न आम्ही पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत यासाठी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करण्याचे आवाहन ही सरपंच शिवाजी बागुल,ग्रामसेवक देवरे यांनी सांगितले.गावात काही अंशी कोरोना महामारिने शिरकाव केला होता आता मात्र माळवाडी गाव कोरोना मुक्त असून याचा आम्हास आनंद तर आहेच परंतु जनतेने केलेले सहकार्य याचा आम्हास अभिमान आहे असेही सरपंच व ग्रामसेवक व तलाठी यांनी सुद्धा सांगितले. याविषयी नागरिकांनी कायम अजूनही शासनाने दिलेले नियम पाळून , सुरक्षित अंतर ठेऊन कायम सतर्कता बाळगावी असेही आवाहन वरील अधिकाऱ्यांनी केले आहे.तर गावात कायम स्वच्छता टिकविण्यासाठी ,गाव प्लास्टिक मुक्त करण्या साठी,प्रत्येकाने स्वच्छता गृह वापरून गाव स्वच्छ ठेव्यासाठी कायम सहकार्य करावे असे आवाहन ही उपसरपंच यशोदाबाई खैरनार , सदस्य निकेश जाधव,सुरेखा बागुल, मालती बागुल यांनी यावेळी केले.माळवाडी गावातील स्मशान भूमीत व परिसरामध्ये विविध वृक्ष लागवड करून परिसर सुशोभित करण्यात आला तर गावातील काही भागात ग्रामपंचायत हददीलगतच्या जागेवर विविध वृक्षारोपण करण्यात आले असून गाव सुशोभित करण्यात आमचे पहिले पाऊल असून लवकरच त्या रोपांना ठिबक सिंचन करून जाळी बसविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच बागुल व ग्रामसेवक देवरे यांनी यावेळी दिली.गावातील सर्व परिसर ,गल्ली _ बोळात स्ट्रीट लाईट पोल वरती बल्प लाऊन गाव अंधरमुक्त करून प्रकाशमय केल्याचे वरील अधिकाऱ्यांनी सांगितले.गावातील सर्व नागरिकांनी कायम योग्य आणि चांगले सहकार्य कायम ठेऊन माळवाडी गाव स्वच्छ, हरीत मय करून आदर्श करण्या साठी हातभार लावावा असे आवाहन सरपंच शिवाजी बागुल, ग्रामसेवक एस.आर.देवरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आवाहन केले.गावातील सर्व माहिती अद्ययावत ठेवण्यात सौ.बोरसे यांचे तर कर्मचारी संजय सोनवणे यांचे सहकार्य लाभते तर सद्या गावातील पाणीपरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन अनिल गोसावी करत असल्याने गावातील पाणी समस्या मिटल्याचे सरपंच शिवाजी बागुल यांनी सांगितले.
