समाज समता संघाच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी बापूसाहेब सोनवणे यांची निवड झाली,संघाची धुरा योग्य दिशेला गेली_ भारत पवार

0
44
  1. नाशिक :४, क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिध  _ नाशिक येथे समाज समता संघाची बैठक नुकतीच  संपन झाली बैठकीत जिल्हा अध्यक्ष पदी बापूसाहेब सोनवणे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आल्याने समाज समता संघाची धुरा नाशिक जिल्ह्यात अगदी योग्य दिशेला गेल्याचे गौरोद्धगार महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक भारत पवार यांनी काढले .त्यामुळे समाज समता संघास नाशिक जिल्ह्यात घरा घरात जाण्यास वेळच लागणार नसून संघा ची बळकटी नक्कीच होणार असा विश्वासही भारत पवार यांनी यावेळी व्यक्त केला .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ४ सप्टेंबर १९२७ रोजी समाज समता संघाची स्थापना केली होती तीच संकल्पना घेऊन मा.विलासजी गरूड साहेब यांनी या संघटनेचे पुनरज्जीवन करून संपूर्ण महाराष्ट्रात गणवेशधारी केडर बेस समाज समता संघ या सामाजिक संघटनेची उभारणी करण्याचा संकल्प केला असून संघटन बांधणीचा भाग म्हणून आज नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत समाज समता संघ ही संघटना पुनरज्जीवित करण्याचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून या देशात मनूवाद प्रबळ झाला असून संविधानिक व्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न चालू आहे. सर्वोच्च न्यायालय,निवडणूक आयोग, प्रसार माध्यमे ही सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले झालेले आहेत.बहुतांश सरकारी संस्थांचे खाजगीकरण केले जात आहे. भारतीय संविधान सध्या धोक्यात आले आहे. म्हणून भारतीय संविधानाचे रक्षण करणे, सरकारी संस्थांचे होणारे खाजगीकरण थांबवणे, खाजगीकरण झालेल्या खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळावे,समाजात समता प्रस्तावित करण,देशातील मनूवाद कमकुवत करून आंबेडकर रूजवणे ही समाज समता संघाची उद्दिष्टे असतील असे त्यांनी सांगितले.या बैठकीला पोपटराव अढांगळे, बापूसाहेब सोनवणे, समीर भडांगे,किशोर पवार, इंगळे सर, जितेंद्र गायकवाड, सागर गायकवाड,विलास जगताप, सचिन जगताप, अवचार साहेबव इतर मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत बापूसाहेब सोनवणे यांची समाज समता संघ नाशिक जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.भविष्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समाज समता संघाचे केडर बेस संघटन तयार करून लवकरच जिल्हास्तरीय भव्य मेळावा घेतला जाईल असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बापूसाहेब सोनवणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here