मालेगाव तालक्यातील पाटणे गावी रू चार लाखाचा दरोडा आणि दागिने लंपास,पोलिसात गुन्हा दाखल,तपासाची चक्रे फिरू लागली
1 min read
मालेगाव _ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिध
_नाशिक जिल्ह्यातल्या मालेगांव तालुक्यातील पाटणे येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. तब्बल ४ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने पळवण्यात आले असून या प्रकरणी मालेगांव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील चोरी प्रकरणी राजु अहिरे रा. पाटणे यांनी मालेगांव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय ३१ ऑक्टोबर रोजी रात्री घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपले होते.
अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व ४ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत.