मालेगाव : कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी – भारतराज पवार – अनेक संकटाना तोड देत मालेगाव मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा ह्या मागणी साठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना तर्फे सातत्याने पाठपुरावा महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात येत होता, महासभेची मंजुरी नंतर महाराष्ट्र प्रशासनाकडे मंजूरी साठी प्रस्ताव पाठविणेपर्यंत संघटनेने सतत प्रयत्न केले, तदनंतर मा. ना. दादाजी भुसे कृषिमंत्री यांचेकडे अध्यक्ष भारत बेद, दिलीप जेधे, कालिचरण बेद हे स्वतः मंत्रालयात जाऊन निवेदन दिले, यावेळी मंत्री ना.भुसे यांनी आश्वासन दिल्यानुसार आज मालेगाव महानगरपालिके सातवा वेतन लागु करणेस मंजुरी दिली ऐन दसरा – दिवाळीच्या सणांच्या तोंडावर गोडवा महापौर, उपमहापौर, आयुक्त यांनी कर्मचारी वर्गाच्या खिशात टाकणार म्हटल्यावर येथे कालच …तोचि आनंद दिवाळी दसरा जणू साजरा करण्यात आला तर ह्या वर्षी कर्मचाऱ्यांची दिवाळी – दसरा जरी जोरात असला तरी कोरणाच्या सावटा खाली नागरिक असल्याने संध्याकाळी सात च्या आत येऊ का घरात म्हणून नागरिक तणावात आहेत . दरम्यान सातवा वेतन आयोग लागू केल्याने म्युनिसिपल कामगार सेना तर्फे मा. ना. दादाजी भुसे , मा. ताहेरा शेख, महपौर, मा. निलेश आहेर, उपमहापौर मा. आयुक्त साहेब, मा. उपायुक्त साहेब, सर्व गट नेते सर्व नगरसेवक, आस्थापना कर्मचारी वर्ग यांचे हार्दिक अभिनंदन केले .यावेळी म्युनिसिपल कामगार सेनेचे भारत बेद ,अध्यक्ष, दीपक यशोद उपाध्यक्ष, दयाराम रिपोटे, नाना म्हसदे, मुकेश कबीरे ,खजिनदार,दिलीप जेधे कार्याध्यक्ष, राजेंद्र जगताप,संघटक,सुनिल बच्छाव, राजेंद्र बेद, रमेश सकट, जितेंद्र चिंडालिया,सुनील मंडोठिया, भरत मंडोठिया,विजू गोयर,सुरेश घुसर, गोपाल सोयते,जेष्ठ कामगार नेते कालीचरण बेद व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
