कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “विशेष –
राज्यपाल हे घटनात्मक निरपेक्ष पद आहे त्याची गरिमा राखणं गरजेचं आहे परंतु आज पर्यंत अनेक राज्यपाल झाले पण असा माणूस राज्यपाल होणे नाही.राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का ?
राज्यपालांची पत्रातील भाषा घटनात्मक नाहीये.राष्ट्रपतींनी त्यांना जाब विचारला पाहिजे ! घटनेत ” हिंदू/ हिंदूत्व ” ला स्थान नाहीय..मोठ्या पदावर बसलेली ही व्यक्ती हिंदूतेर व्यक्तींकडे कोणत्या दृष्टीने पाहात असणार,हे स्पष्ट होतंय..! पदावर हे सर्व हिंदू म्हणून कामकाज पाहतात,की भारतीय म्हणून..?
यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्याकडे विचारणा करावी..!कोरोना महामारीत मंदिरे बंद होती अन आता पण आहेत कारण मंदिरात देवच नव्हते व आता पण नाहीत.त्यांनी गुपचूप आपली जागा बदलली आहे हे कोणाच्या लक्ष्यात पण कसे आले नाही ? देव पोलिसांच्या वेशात रस्त्यावर,सफाई कर्मचारी, तर डॉक्टर,नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेशात रुग्णालयात अहोरात्र लक्ष ठेऊन होते व आताही लक्ष ठेऊन आहेत आणि भटके खोटे पणा करणारे,जनतेशी कोणतेही सोयर सुतक नसणारे,सत्ता स्वार्थी राजकीय भक्त देवाची मंदिरे उघडावे म्हणून मंदिराच्या बाहेर खोटं खोटं उपोषण करीत लोकांची दिशाभूल करण्यात मग्न आहेत..!
मंदिरा सोबत गुरूव्दारा,जैन,बौध्द, चर्च,मशिदी,बंद असतांना ते ओरडत नाहीत मग मंदीरांसाठीच कां ओरडतात.त्या धर्माचे लोक धार्मिक नाहीत का ? ते त्यांच्या श्रद्धास्थानांना मानत नाहीत का? याचा अर्थ एकच बाकी धर्मात भटाकढून लुट केली जात नाही,तर हिंदू धर्मात भट सर्व गरिब, सामान्यांची लुट करतात धार्मिक स्थळे उघडणे हा मुद्दा हिंदुत्वाचा आहे.
खरे तर हा मुद्दा धर्मनिरपेक्षतेचा आहे.भारतामध्ये ज्याक्षणी प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय होईल,त्या क्षणी मंदिरे उघडतील,मशिदी,दर्गे,चर्च, गुरुद्वारा उघडतील.भारताने देवामुळे 70 वर्षात प्रगती केली नाही मग मंदिरासाठी एवढा आंदोलन का,मंदीर ऊघडली की हे गरिब भोळे भाबडे लोक देवपूजा करत रमून जातात मग ह्याला चरायला रान मोकळ जनतेला येड करुन किंवा दीशाभूल करतात *आमच्यासाठी आई वडीलच आमचे देव* ह्याच्या पेक्ष्या कूठला संदेश हवा पण मनूवादी निर्लज्य असतात ते असल वाचत नाहीत..
स्वतःच्या घरातल्या मंदिरा मध्ये कधी पूजा न करणारे मंदिर उघडा म्हणून आग्रह करत आहेत श्रद्धा असेल तर घरात ही पूजा वैगेरे करता येते.देवाने पुजाऱ्यांला चांगले हातपाय दिले आहेत. त्यांचा वापर काम धंदे करण्यासाठी करा.फक्त दक्षिणा(भिक) मागून पोट भरायची सवय सोडा. म्हणे मंदिर बंद असल्याने पुजाऱ्यांचे हाल… शेतकर्यांचे परतीच्या पावसाने हाताला आलेलं पीक वाया गेलं ते नाही का दिसत या पुजाऱ्यांला पञकारला? शेतकऱ्याच्या कुटुंबावर काय वेळ आहे हे नाही का दिसत NEWS वाल्यानो ?
म्हणजे मंदिर सुद्धा यांच्यासाठी पैसा कमावण्याचा धंदाच आहे हे सिद्ध झालंय. 6 महिने मंदिरे बंद राहून सुद्धा सगळं ठीक चालूय यातून लोकांनी बोध घ्यावा आणि आपली कमाई दानपेटी मध्ये टाकण्यापेक्षा चांगले शिक्षण द्यावे स्वतःच्या मुलांना,संत गाडगेबाबा म्हणाले होते की देवळात देव नसून पुजाऱ्याचं पोट भरण्याचा ठिकाण आहे,त्यामुळे भाजप देवुळ चालू का करायला सांगत आहे हे कळलं असेल,मोठ्या मंदिरांच्या ट्रस्ट ने लहान मंदिराच्या पुजाऱ्यांना मासिक वेतन द्यावे. जनतेने दान दिलेले जे धन मोठ्या मंदिर ट्रस्ट कडे पडून आहे, आता पर्यत लोकांना दान केल,ते कुठे गेला,या पुजारी भटाना लोकांना फुकटचे खारक,बदाम खायला पाहिजे,खाऊ खाऊ माजुन गेलेत,आता काम, मेहनत करा आणि खा शेतकऱ्यांना कापुस वेचायला सध्या मजुर मिळत नाही आणि सध्या पावसाने पण कहर केला हे हातात आलेला घास हिरावून चाललेला उघड्या डोळ्यांनी दिसत हे त्या मुळे सगळ्या पुजार्यांनी जे लोक मंदिर बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीत आहेत त्या सर्व पुजाऱ्यांनी सहकुटुंब कापुस वेचायला जावे 5 ते 10 रुपये किलो भाव आहे सध्या वेचायला भरपुर रोज पडेल व्यायाम पण होईल आमच्या शेतकरी बांधवांना मदत ही होईल..
*मंदिरात गेल्यावर गरिब सर्वसामान्य माणसाला देवाच नीट दर्शन घेऊन देत नाहीत भट.आज हेच पुजारी सर्वसामान्य माणसं मंदिरात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.*
*मंदिर सुरू झाल्यावर परत VIP माणसं पुढे आणि आपण गरिब मागे असू !*
आता पर्यत दान पेटी तील पैसे कुठे गेले आज खरच लोकांना विचार केला पाहिजे,देव मंदीरात राहतो का पुज्यारी आणी देवाला खरच पैशाची दाणाची आपन गरिब सर्वसामान्य लोक मंदीरात दान करतो आणी त्या दानावर हे भट लोक आरामात आपल पोट भरतात न काही काम करता यवडच नाही तर या लोकांचे बंगले गाड्या शेकडो गुंटे जागा भटांनी घेतल्या आहेत.मी घरी सत्यनारायण पूजा ठेवली असता ब्राम्हणाला पूजेचा सामान विचारलं तर बोलला कि खोबर,खारक बदाम,दही,तुप वैगरे सर्व घेऊन मि आलो मग सत्यनारायण ची पुजा झाली आणी ब्राम्हण सर्व दही,तुप,खारका,खोबर,बदाम घेऊन ब्राम्हण घरी गेला..मग मी विचार केला कि,मी माझ्या मुलांना कधीच खोबर,दही,तुप,बदाम नाही दिले खाण्यासाठी मग ब्राम्हणला का देयचे, ब्राम्हण दुसऱ्याचं जमा केलेले पैशावर मजा मारतात,ब्राम्हणाच्या घरी कधी सत्यनारायण बघितला का मग तुम्ही आपण का करायचा,मंदिरातले पुजारी व मस्जिद मधले मौलानी,यानं संध्या काही काम धंदा नसेल तर कृपया 250 रुपये रोजानी सोयाबीन काढायला जावे…
आम्ही पण तेच करत आहोत,म्हणजे मंदिराचे पुजारी सुध्दा मंदिराच्या भारोष्यावर जगतात.देवाची पूजा करणे म्हणजे सेवा वगरे काही नवे नाही तर…payment घेणारा पुजाऱ्यांला डिग्री कोणत्या कॉलेज ची असेल बर..मंदिर उपजिवकेचे साधन नाही ते आमचे श्रध्दांस्थान आहे.पुजारी लोकांनी इतर लोकांप्रमाने कामे करून आपली उपजिवीका भागवावी.मंदिरं बंद असल्याने ज्या पुजाऱ्यांची आर्थिकस्थिती खराब झाली असेल,त्यांनी धनलक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र पूजा करावी स्वतःच्या घरी,देव धावेल मदतीला..यज्ञ होम हवन करा.आपोआप मदत होईल..दान दक्षिणा, व्रत वैकल्ये यातून घरी बसल्या येणारा पैसा गेला, वर्षात येणाऱ्या अधिक मासाची कमाई गेली त्यामुळे ही सर्व तडफड आहे..
दक्षिणा बंद झाली कदाचित याचाच थयथयाट असेल देव बिचारे शांत आहेत त्यांची काहीच हरकत नाही.आपण ज्या गावात शहरात राहतात तिथं ग्रंथालय शाळांची गरज आहे,का प्रार्थना स्थळांची ?ग्रंथालय शाळा ही आपली उद्याच्या भविष्याची आवश्यक गरज आहे, पण शाळा ग्रंथालय सोडून धार्मिकस्थळे उघडून काय सिद्ध करायचं ?
मग मंदिर कशासाठी उघडायची ? देवाची भक्ती करण्यासाठी उघडायची की पुजाऱ्यांची पोट भरण्यासाठी उघडायची ? म्हणजे मंदिर आस्थेचा विषय आहे कि पैसे कमावण्याचा मार्ग ? भटांनी मंदिरात पुजा पाठ करण्यात वेळ देण्यापेक्षा थोडे दिवस बाहेर चे जग पहा म्हणजे समजेल काय करायचे आणि काय नाही, गरिबीत पण जगून पहा..अनुभव घ्या थोडा.गरिबी काय असते कळू द्या स्वत:ला कुदळ,फावडे घेऊन या गटारी लाईन च्या कामाला तुम्हांला रोजगार पण मिळेल जनतेची काम पण होतील..
जनता खुश,पुजारी पण खुश..पुजारी उपाशी नाहीत ते तुपातल खातात आज शेतकरी कामगार चटणी भाकर खाऊन जगत आहेत.मंदिर उघडण्यासाठी भट आंदोलन करणारे मराठ्यांच्या आरक्षणासाठी तुमचे आंदोलन कधी करताय ?
देव जर सर्व शक्तीमान आहे, तर देवाची इच्छा होईल तेव्हा मंदिरे उघडतीलच ना,भटांनी विनाकारण थयथयाट करू नये.मंदिर उघडा… गर्दी करा… श्रध्देपोटी जाणारी गरिब भोळीभाबडी माणसं मरू द्या…! व्वा काय खेळ मांडलाय. सरकार किंवा विरोधक चांगली आरोग्य सुविधा देऊ शकले नाहीत. हजारो गरिब चांगली माणसं मरताना सुध्दा (३३ कोटी पैकी) कोणताही देव माणसं वाचवायला आला नाही.
भक्तानों… जागे व्हा. पुजाऱ्याचे हित बाजूला ठेवा…
जर मोठी धार्मिकस्थळे ऊघडण्यापूर्वी तेथे शेजारी ५०/१०० बेडसाठी शेडस् बनवावेत. तेथे फक्त जेवणखान असावे. डॉ.औषधोउपचार नसावेत.
जे भक्त दर्शनाला येऊन कोरोनाग्रस्थ होतील त्यांना तेथे अॅडमीट करावे व त्या भक्तांनी केवळ त्या देवाचा धावा करून बरे करून घ्यावे.देवांची पावर व भक्तीचा महिमा तरी जगाला कळेल.
जे असे करण्यास तयार होणार नाहीत ते त्यांचा देवावर विस्वास नाही. जे भक्त धावा करतील व महिन्याभरातही बरे होणार नाहीत,हे सिध्द करेल की देव नाही व कोणाचा असला तरी तो शक्तीहीन आहे हे सिध्द होईल..!
देशांत बलात्कार होतो तेव्हा पुजारी निषेध करतात का..
*ज्या देवाला तुमच्या स्पर्शाचा विटाळ होतो….*
*जो देव तूमच्या सावली ने बाटतो….*
*असा देव आपल्या काय कामाचा…*
मग का जायायच अशा देवाच्या दर्शनासाठी आपल्या मंदिराच्या आवारात जाण्याने मंदिर बाटायची
अशा कित्येक घटना(हत्या) मंदिरात गेल्यामूळ झाल्या*
*मग का कशासाठी हवा असा जिव घेणारा देव।*
त्यामुळे तुमचा परिवार हा भय मुक्त,भट मुक्त बनवा तरच प्रगती होईल..
✍️लेखक : शब्दांकन – संतोष शकूंतला आत्माराम
बादाडे,* पत्रकार ,
