वाचन प्रेरणा दिवस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन साजरा करा – रामजीभाई बेरा

0
28

 

पनवेल / खारघर – दि.१६ – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” -दीपक शिंदे – यांज कडून –
देशाचे माजी राष्ट्रपती,थोर शास्त्रज्ञ व भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून १५ ऑक्टोबर हा दिन सर्वत्र *वाचन प्रेरणा दिवस* म्हणून साजरा केला जातो.सध्या कोरोना विषाणूमुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत,त्यात सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे.
शालेय मुला मुलींना टीव्ही, स्मार्टफोन,कॉम्प्युटर, इंटरनेट पासून परावृत्त करून वाचनाची सवय व आवड निर्माण करणे हाच ह्या वाचन प्रेरणेचा उद्देश्य असतो.पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ५ चे भाजप नगरसेवक रामजीभाई केला बेरा यांच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.

नगरसेवक रामजीभाई बेरा यांनी म्हटले की मुलांना वाचनाचे महत्त्व समजावे,वाचनाची गोडी निर्माण हवी व आकलनशक्ती वाढावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

ही स्पर्धा खारघर मधील विद्यार्थ्यांसाठी असून एखादी चांगल्या प्रेरणादायी कथेचे 2 मिनिटांचे वाचन ऑडिओ किंवा व्हिडिओ च्या माध्यमातून 9137809549 या क्रमांकावर वॉट्स अप करावे.
अंतिम तारीख १९/१०/२०२० सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल.
(मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेपैकी एका भाषेत वाचन असावे)

पारितोषिके
*१ ली ते ५ वी – प्रथम द्वितीय क्रमांक*

*६ वी ते ९ वी – प्रथम द्वितीय क्रमांक*

आपले नाव:
इयत्ता:
शाळा:
वॉट्सअप क्रमांक
पत्ता (खारघर):
वरील क्रमांकावर पाठवावे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here