नगरसेवक परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष पदी दिनकर पाटील तर जिल्हा अध्यक्ष पदी सुनील गायकवाड

0
28

 

 

वासोळं : ग्रामपंचायत सरपंच परिषदेच्या धर्तीवर नगरसेवक परिषदेची स्थापना झाली असून पहिले राज्य उपाध्यक्ष म्हणून नाशिक महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक दिनकर पाटील यांची निवड झाली आहे. तर जिल्हाध्यक्षपद मालेगावला देण्यात आले आहे.

 

सरपंच व ग्रामपंचायत संघटनेप्रमाणे नगरसेवकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक परिषदेची स्थापना करण्यात आली ही परिषद नगरसेवकांप्रमाणेच नागरिकांचे विविध प्रश्न सोडविणार असून नगरसेवक परिषदेची कार्यकारिणीही जाहिर करण्यात आली .असून पहिले राज्य उपाध्यक्ष म्हणून नाशिक मनपाचे माजी सभागृहनेते नगरसेवक दिनकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून  पदाची प्रतिष्ठा वाढवून निवड सार्थ ठरविल असे वक्तव्य दिनकर पाटील यांनी केलंय. नाशिच्या जिल्हाध्यक्ष पदी मालेगाव भाजपा नगरसेवक सुनील गायकवाड तर महिला अध्यक्षपदी पुष्पां आव्हाड यांची निवड करण्यात आली. नगरपरिषद मुबई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे, सरचिटणीस कैलास गोरे यांनी नपदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here