Home Breaking व्हि के डी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलनामाचा जयघोष

व्हि के डी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलनामाचा जयघोष

0
5
Oplus_131072

भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१           देवळा. : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क _

एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित व्ही.के.डी. इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भावडे (ता. देवळा, जि. नाशिक) येथे देवशयनी आषाढी वारीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने शालेय आवारात पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईंचे साक्षात दर्शन घडावे, अशी मनोहारी सजावट करण्यात आली होती. पावसाळी निसर्गाच्या रम्य वातावरणामुळे संपूर्ण परिसर अधिकच प्रसन्न झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी पांडुरंग व रुक्मिणी यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या. त्यानंतर विठ्ठल-रखुमाईंच्या वेशातील विद्यार्थ्यांना सहभागी करून भव्य दिंडी काढण्यात आली. दिंडीत विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, वीणा आदी वाद्ये हातात घेऊन “विठ्ठल! विठ्ठल!!” असा अखंड नामजयघोष केला. या जयघोषाने संपूर्ण व्ही.के.डी. विद्यालय परिसर विठ्ठलमय झाला होता.

दिंडीनंतर विद्यालयाचे प्राचार्य नितीन वाघ यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी सामूहिकरित्या विठ्ठलाची आरती गायली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध भक्तिगीतांवर आकर्षक नृत्य व कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुसुम शिरोळे व आश्लेषा जाधव यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख क्रांती सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेचे चेअरमन श्री.संजय देवरे सेक्रेटरी सौ.मीना देवरे यांनी कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here