भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१
देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट नासिक संचलित एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल भावडे,येथे महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य एस.एन.पाटील,पर्यवेक्षक सुधीर सोनवणे तसेच बबलू देवरे,सागर कैलास यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला हार पुष्प वाहून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.विद्यालयातील विद्यार्थी अर्णव शिरसाठ,अर्णव आहेर, रियांश भामरे,दिव्या कापसे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर वक्तृत्व सादर केले. विद्यालयाची विद्यार्थिनी मनस्वी कदम हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एस.एन.पाटील यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले.या सर्व कार्यक्रमाला विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख अजय बच्छाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यशस्वीरित्या पार पडलेल्या कार्यक्रमाला विद्यालयाचे संगीतशिक्षक रतन भोईर,कलाशिक्षक विकास शिंदे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे व सेक्रेटरी मीना देवरे यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून,महात्मा फुले यांना अभिवादन केले.





