आयात उमेदवाराविरुद्ध मालेगावात तीव्र नाराजी डॉ. तुषार शेवाळे यांनी दिला जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा

0
24

भारतराज पवार : मुख्य संपादक.                             आपल्या लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी  घराघरातील प्रत्येकाच्या मनामनात अगदी काही सेकंदात  २ लाख ६१ ह. +  मतदारांपर्यंत आपण आणि आपले समाज कार्य पोहचवा …. तात्काळ संपर्क : ९१५८४१७१३१

मालेगाव : कटा.टाइम्स महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन.वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : लोकसभा निवडणूक अगदी प्रचाराच्या मेन रडार वर असताना प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवार जागा वाटपाचा तिढा अधिक गुंतागुतीच्या सापळ्यात अडकत आहे.हा सापळा काही अंशी यशस्वी करण्यात भाजप पक्षाच्या नेत्यांना मात्र यश येत आहे. असेच यश राष्ट्रीय प्रमुख पक्षाचे नेते हातचे भाजपला जाऊ देऊन त्यांचे हातचे बाहुले बनणार की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रसने आयात तर घेतलाच परंतु भाड्याने घेतलेल्या उमेदवार व्यवसायाने डॉक्टर परंतु त्या उमेदवारास स्थानिक पातळीवर नाशिकच्या कार्यकर्त्यांनी अडगळीत टाकले अशा उमेदवारास काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे धुळे मतदार संघातील विशेषतः मालेगाव येथील काँग्रेस कार्यकर्त्यात तीव्र नाराजी पसरली असून आम्हास आयात केलेला  भाड्याचा उमेदवार चालणार नाही अशा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून काँग्रेसच्या या कृतीचे निषेध करण्यात आला.

दरम्यान काँग्रेसने दिलेला उमेदवार आम्हास चालणार नाही काँग्रेस बळीचा बकरा बनून भाजपचा उमेदवार निवडण्या साठी नामी खेळी खेळल्याने त्याचा निषेध व्यक्त करून मी काँग्रेस पक्षाचा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.अशी माहिती डॉ.तुषार शेवाळे यांनी ” महाराष्ट्र न्यूज ” ला बोलतांना दिली.

एके काळी काँग्रेस पक्षाला नाशिक जिल्ह्यात अत्यंत वाईट दिवसांना सामोरे जावे लागत होते एव्हणा काँग्रेस पक्षाचे सदस्य होण्या साठी कोणी पुढे येत नव्हते.इतका कठीण प्रसंगाचा सामना अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांना करावा लागला.तरी सुद्धा डॉ.शेवाळे यांना जिल्हा (ग्रा.)अधक्ष पदाची माळ गळ्यात घालावी लागली आणि गेल्या १० ते १५ वर्षांपासून काँग्रेसला नाशिक जिल्ह्यात मजबूत बाळसे मिळवून दिले. असे असताना डॉ.शेवाळे यांनी धुळे जिल्ह्यात सुद्धा आपल्या प्रामाणिक पणाचा , आपल्या चांगल्या स्वभावा मुळे आणि नेहमीचं पाय जमिनीवर ठेऊन लहान – मोठ्या कार्यकर्त्यांशी जवळीक ठेऊन धुळे जिल्ह्यात सुद्धा काँग्रेस पक्षाचे बाळसे तयार केले .आणि आज डॉ.तुषार शेवाळे यांच्या मुळे धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेसला सोनेरी दिवस पहायला मिळाले.तरी सुद्धा डॉ.शेवाळे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यां , कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आयात उमेदवार घेऊन डॉ.शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी बहाल केली.म्हणजेच भाजपाच्या हाती आयते कोलीत देऊन भाजपा उमेदवार ( जो कोणी असेल) निवडून देण्यासाठी ही खेळी करून काँग्रेस भाजपचा बळीचा बकरा बनणार.म्हणूनच मी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रचे सर्वेसर्वा नाना पटोले यांचे कडे राजीनामा दिला असून वेळ गेली नाही. त्यांनी नव्याने विचार करून लायक उमेदवारास उमेदवारी द्यावी असेही शेवाळे यांनी म्हटले आहे.

भाड्याचे आयात उमेदवाराचे काम आम्ही करणार नाही त्यांचे मालेगाव , धुळे विशेषतः सटाणा शहरात सुद्धा चांगले कार्य पक्षासाठी योगदान नाही आणि अशा उमेदवारास धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करणे म्हणजेच स्वतःचाच विश्वासघात करून घेणे म्हणजेच स्वतःच्याच पायावर धोंडे आपटून घेणे .अशी परिस्थिती काँग्रेसने दिलेल्या उमेदवारामुळे भविष्यात होणार असे चित्र निर्माण झाल्याने नेत्यांनी नव्याने विचार करून आजची परिस्थिती पाहून नव्याने उमेदवारी जाहीर करावी असेही डॉ.शेवाळे व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर केले. असेही महाराष्ट्र न्यूज शी बोलताना शेवाळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here