अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी अधिकारीच फितूर भूमाफिया होतो शिरजोर , तक्रारदार होतो कमजोर , पैसा लाव पैसा कमाव हाच अधिकाऱ्यांचा डाव ?

0
28

भारतराज सिताताई पांडुरंग पवार : मुख्य संपादक     लोकसभा मतदार संघ मोठा सर्वच मतदारांना भेटणे शक्य नाही म्हणूनच आम्ही आमच्या ” महाराष्ट्र न्यूज ” ह्या वेब चॅनल च्या माध्यमातून काही सेकंदात संपूर्ण महाराष्ट्रा सह आपापल्या मतदार संघातील प्रत्येक मतदाराच्या घरा घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात तुमचे कार्य वाचून  राज करणार म्हणून आजच संपर्क करा…संपर्क  : ९१५८४१७१३१ 

मुंबई : कटा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : संजय बोर्डे

मुंबई तील २४वार्ड पैकी मालाड पि उत्तर विभाग हा सर्वांत मोठा भ्रष्टाचारी वार्ड मानला जातो. कारणं मालाड पश्चिमेला स्टेशन पासून तर मडजेट्टीपर्यंत कलेक्टर लँड प्रायव्हेट लँड यावर भूमाफियांनी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठमोठे अनधिकृत तीन मजला चार मजला एक एकर दोन एकर बांधकामे उभारले आहेत तसेच पूर्वेला स्टेशन पासून तर संतोष नगर पर्यंत हाच प्रकार चालू आहे .परंतु उत्तर विभागाचे अधिकारी यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही याउलट तक्रारदाराची माहिती भूमाफिया ठेकेदारांना पुरवणे ,तक्रारदारावर खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार करतात याचेच एक उदाहरण म्हणजे ‘महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे” यांनी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या लावल्या असता व माहिती मागितले असता त्यांना 353 च्या गुन्ह्यामध्ये षडयंत्र करून अडकवले होते .आजही असे प्रकार चालूच आहेत कित्येक अधिकाऱ्यांना लाचलुचपत पथकाने अटक सुद्धा केली परंतु त्यांना निलंबित न करता बढती देण्यात आली त्यामुळे कुंपणच शेत खाते तर जायचे कुठे सहाय्यक आयुक्तांना भेटण्यास गेलो असता त्यांचे सचिव परस्पर तक्रारदारास परत पाठवतात .वारंवार तक्रार करून सुद्धा अनधिकृत बांधकामावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही .याउलट तक्रार जर आली तर अधिकाऱ्याचा मलिदा वाढतो !पूर्वेला क्रांतीनगर आप्पा पाडा ,कुरार विलेज ,पिंपरी पाडा ,पठाणवाडी ,आंबापाडा, पाल नगर, संतोष नगर अशा सर्वच परिसरामध्ये मोठी बांधकामे उभारण्यात चे कार्य चालू आहे. पश्चिमेला ओरलाम,एस वी रोड, लिंक रोड राठोड एक नंबर दोन, नंबर ,तीन नंबर ,चार नंबर पाच नंबर ,सहा नंबर, सात नंबर, आठ, नंबर भावडेकर नगर अंबुजवाडी कंपाऊंड ,चिकूवाडी कमल तलाव, पठारेवाडी ,मालवणी गाव ,मरून खान नगर ,मालवणी चर्च ,एरंगळ मड तलाव,वेणीला तलाव व इतर सर्व ठिकाणी येईल सहाय्यक आयुक्त यांच्या आशीर्वादाने अनधिकृत कामे चालू आहेत हाय कोर्टाने कामे थांबवायची आदेश दिलेले आहेत कारण दिल्लीनंतर भारतातील मुंबई हे शहर सर्वात जास्त प्रदूषित झाले आहे याचा आकडा 300 च्या वर गेला आहे परंतु हायकोर्टाच्या आदेशाला सुद्धा केराची टोपी दाखवण्यात येत आहे एकीकडे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोहीम राबवत आहेत व दुसरीकडे मनपाचे भ्रष्ट अधिकारी बांधकामाला मुभा देऊन प्रदूषण वाढवत आहेत भ्रष्टाचार करत आहेत व त्यामध्ये बक्कळ पैसा लाटत आहेत तसेच काही अनधिकृत बांधकामांमध्ये अधिकाऱ्यांची सुद्धा भागीदारी आहे.तर न्याय मागायचा कुणाकडे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here