देवळा आणि नांदगाव तालुका भाजपा विरोधात उमेदवार डॉ. भारती पवार विरुद्ध संताप

0
27

भारत सिताताई पांडुरंग पवार  : मुख्य संपादक.          वेळ कमी मतदारसंघ मोठा म्हणून काही सेकंदात आपली मुलाखत / न्यूज महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात २ लाख ५९ ह. ९९४२ + वाचकांपर्यंत पोहचवा . आजच संपर्क करा .मो.९१५८४१७१३१                                         देवळा / नांदगाव : कटा.महाराष्ट्र न्यूज  ऑन लाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांनी प्रचारा साठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झाले असून मतदारांपर्यंत पोहचण्या साठी अनेकांची जीवाची घालमेल सुरू आहे.मात्र त्यांची ही घालमेल मतदारांच्या विकासासाठी , गाव विकासासाठी घातली असती तर आज त्या उमेदवारांना डोंबारी कसरत करावी लागली नसती.

अशीच कसरत दिंडोरी लोकसभा मतदार संघातून भाजपा तर्फे उमेदवारी करत असलेले खा.डॉ. भारती पवार यांच्या गोड बोलण्या मुळे आणि मतलब साधू वृत्ती मुळे देवळा आणि नांदगाव तालुक्यात तीव्र नाराजी पसरली असून येथे भाजपा विरुद्ध लाट निर्माण झाल्याने डॉ. भारती पवार यांचे भवितव्य धोक्यात येणार ? अशी चर्चा देवळा व नांदगाव शहरात आणि तालुक्यात रंगू लागली आहे.

याबाबत देवळा तालुक्यातील आर.पी. आय.आठवले गटाचे जिल्हा संघटक शांताराम दादाजी पवार , देवळा तालुका अध्यक्ष  कैलास रमेश पवार यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले की , डॉ. भारती पवार केंद्रीय राज्य मंत्री असताना त्यांनी फक्त हार, गुच्छ घेऊन स्वतःचाच सत्कार करण्यात त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ सत्कारणी घातला. देवळा शहरातील , तालुक्यातील मतदारांसाठी कोणते योगदान दिले ? त्यांचे विकासासाठी डॉ.पवार यांनी कोणती विकासाची कात टाकली ? आज पावेतो त्यांनी कोणत्या दलीत ,बौद्ध वस्तीत जाऊन आम्हा दलितांच्या समस्या जाणून घेतल्या ? त्यांच्या किती समस्या सोडविण्यासाठी त्यांनी इंटरेस्ट दाखवला ? या आणि अशा  अनेक संताप जनक प्रश्न शांताराम पवार व कैलास पवार यांनी महाराष्ट्र न्यूज ह्या ऑनलाईन वेब चॅनल च्या माध्यमातून डॉ.पवार यांना विचारले असून आम्ही समस्त दलीत बौद्ध समाज हा भाजपा विरोधात मतदान करणार असल्याची संताप जनक प्रतिक्रिया पवार नेत्यांनी यावेळी दिली.

तर खा. भारती पवार यांच्याच अगदी जवळच्याच नातेवाईकांचे देवळा येथील येच पी (HP) चे अर्जुन सागर गॅस एजन्सी भर वस्तीत असून गॅस गोडाऊन च्या आजू बाजूस दुकान ,जवळच रहदारी असते, लोक वस्ती जवळ आहे. असले ज्वालाग्रही व स्पोटक वस्तुंचे किंवा स्पोटक पदार्थांचे गोडाऊन भर वस्तीत आणि अगदी गावा जवळ ठेवता येत नाही.परंतु आमचे कोण काय वाकडे करणार ? असे समजून आज ही हे गोडाऊन गावाजवळ , लोकवस्तीत आहे.आणि समजा एखाद्या वेळी अघटीत घटना घडली तर ?  यास जबाबदार कोण ? हे गोडाऊन गावाजवळ,लोकवस्तीत ठेवण्या साठी आशीर्वाद कोणाचा लाभला ? यासाठी एन ओ सी कोणाची ? याबाबत व अन्य बाबतीत आवाज मुख्य संपादक भारत पवार यांनी उठवला आहेच याविषयी माहिती गोडाऊन मालकांनी स्वतः जशी औरंगाबाद कंपनीस दिली त्याच प्रमाणे तीच माहिती स्वतः गोडाऊन मालकांनी पत्रकार भारत पवार यांना देणे गरजेचे आहे. परंतु औरंगाबाद येथून येचं पी गॅस कंपनीने यात हस्तक्षेप करत याबाबत ची माहिती हिंदी किंवा मराठी भाषा टाळून जाणून बुजून इंगजी भाषेचा वापर करून वेळ काढू पणा धोरण अवलंबिले आहे. आणि इंग्रजीत थातूरमातूर माहिती दिली  ते उमेदवार पवार यांच्या जोरावर त्यामुळे सुद्धा संताप व्यक्त केला जात असून याविरुद्ध लवकरच  जिल्हाधिकारी व दुकान निरीक्षक नाशिक आणि ग्राहक मंच यांचे कडे तक्रार दाखल करणार असल्याचे पत्रकार भारत पवार यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.

एकूणच यांची अशी ही कामे स्वतःचं हित साधण्यासाठी आणि मतदारांशी फक्त गोड बोलून मतदारांना झुलवत ठेवणे हिच यांची काम असल्याने उमेदवार भारती पवार यांचे विरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. भारती पवार यांचे हे महान कार्य आम्हास मान्य नसून माजी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे.त्यांचे कार्य खरोखर चांगले होते आणि आहे.असे शांताराम पवार यांनी सांगितले.भाजप चे नेते म्हणतात ह्या वेळी आम्ही ४०० खासदार निवडून आणू परंतु २०० तर खासदार निवडू द्या असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

तर नांदगाव येथे उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेल्या बॅनर वर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदासजी आठवले व आर.पी. आय.जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांचे फोटो हेतूपुरस्कर डावलले असल्याचा आरोप गुरूकुमार निकाळे यांनी केला असून त्यामुळे नांदगाव तालुक्यातील दलीत बौद्ध जनतेत तीव्र नाराजी पसरली असून आम्ही भाजपचे काम करणार नाही असा जोरदार इशारा रिपब्लिकन पक्षाचे युवक नांदगाव तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी दिला.

जिल्ह्यातील आर.पी.आय.आठवले गट याबाबत लवकरच आपली भूमिका जाहीर करतील. त्यामुळे जिल्ह्यातील आर.पी.आय. कार्यकर्त्यांचे लक्ष जिल्हा नेत्यांकडे लागले आहे.

देवळा येथील कार्यक्रमात जिल्हा संघटक शांताराम दादाजी पवार , देवळा तालुका अध्यक्ष कैलास रमेश पवार, सुधाकर पांडुरंग पवार,विकी पवार , विकी गरुड यांसह अनेक दिग्गज मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

१४ एप्रिल रोजी विश्वरत्न , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध रोषणाईने ,  अत्यंत उत्साहात व शिस्तबद्धतीने जोरदार साजरी करणार असल्याची माहिती येथील तरुण कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here