माळवाडी ग्रामपंचायत व म.फुले विद्यालय मार्फत मतदान जनजागृती अभियान संपन्न

0
26

भारतराज सिताताई पांडुरंग पवार  : मुख्य संपादक.     आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

देवळा / माळवाडी  : कटा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  : देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायती तर्फे , महात्मा फुले विद्यालय व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळे मार्फत संयुक्त पणे संपूर्ण माळवाडी गावात मतदान जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.

यावेळी गावातील प्रत्येक गल्लीतून येथील म.फुले विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच  जि.प. प्रा.शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, व शिक्षक , शिक्षिका, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य , ग्रामसेवक , पत्रकार , पोलीस पाटील , ग्रामस्थ , गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील प्रत्येक गल्लीतून मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. मतदान करणे म्हणजे श्रेष्ठ दान करणे हा आपला हक्क असून , राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान करा आणि सरकार निवडा ” आदी घोष वाक्यांनी यावेळी जनतेचे लक्ष वेधून घेतले होते.यासाठी येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक , सरपंच, उपसरपंच शाळेचे विद्यार्थी _ विद्यार्थिनी आणि शिक्षक, शिक्षिका आदींनी परिश्रम घेतले.

अभियान कार्यक्रमास सरपंच अलकाबाई पवार , उपसरपंच मयूर सुरेश बागुल , ग्रामपंचायत सदस्य तात्याभाऊ भदाणे , हर्षाली बच्छाव , नेहा बागुल , प्रवीण गांगुर्डे , अरुणा पवार , हेमंत बागुल , गायत्री अहिरे , कल्पना शेवाळे , ग्रामसेवक संभाजी देवरे, कर्मचारी संजय सोनवणे , अनिल गोसावी , पोलीस पाटील सौ.वाघ , सर्व शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी शिक्षिका , आशा सेविका , गावातील ग्रामस्थ व तरुणांनी विशेष सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here