मालेगाव सा.बां.विभागाचे अधिकारी भ्रष्ट त्यांची कामे निकृष्ट आमचे कोणीही वाकडे करणार नाही ? हेच आमचे उद्दिष्ट ! _ पीपल्स रिपब्लिकन पार्टी

0
58

भारत पवार : मुख्य संपादक.                                     पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो. ९१५८४१७१३१.    मालेगाव कटा.महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगावी रस्ते विकासाची कामे जोरदार होत असल्याचे गाजावाजा केला जात आहे असे असले तरी रस्ते विकासा बरोबरच स्वतःचा विकास सुद्धा संबंधित अधिकारी करत असून म्हणूनच रस्ते आणि शासकीय इमारत बांधकामे निकृष्ट व बोगस दर्जाची केली जात असून ह्या कामांची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी असे मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन वसंत बोराळे व तालुका अध्यक्ष चेतन धिवरे , माहिती अधिकार कार्यकर्ता रामदास बच्छाव ,प्रमोद पाटील,शरद हातगे यांनी मालेगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यांची कामे , शासकीय इमारत बांधकामे निकृष्ट व बोगस दर्जाची होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेले नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झाले भ्रष्ट यांची कामे आहेत निकृष्ट कितीही कोणासही तक्रार अर्ज द्या आमचे कोणीही वाकडे करणार नाही हेच आमचे उद्दिष्ट ? अशा अविर्भावात सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अभियंता वावरत आहेत. आम्हास बड्या बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे आमचे कुणी वाकडे करणार नाही अशा खुमखुमित असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे चारो उंगली घी मे असल्याचे त्यांच्या कामा वरून व त्यांच्या दैनंदिन कामकाज करण्या वरून दिसतेय.आज पावेतो अनेकदा सांगून , तक्रार अर्ज करून सुद्धा संबंधित सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांनी आमच्या अर्जांना तुच्छ मानत केराची टोपली दाखवली.तर झालेल्या रस्त्यांची होत असलेल्या रस्त्यांची कामे तसेच शासकीय इमारत बांधकामे निकृष्ट दर्जाची असल्याने त्या कामातत मोठाच भ्रष्टाचार झालेला असल्याचा आरोप वरील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सदर सर्व कामांची गुणवत्ता नियंत्रण दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. व यापुढे केले जाणारी कामे उत्कृष्ट व दिलेल्या अंदाजपत्रकांनुसारच केली जावीत अशी मागणी सुद्धा आपल्या तक्रार अर्जात तहसीलदार यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत सदर कामांची संबंधित दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यात येत नाही तोपर्यंत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव यांच्या कार्यालयासमोर  बे मुदत उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष नितीन वसंत बोराळे ,. तालुका अध्यक्ष चेतन धिवरे यांनी घेतला आहे.उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here