पालकमंत्री ना.दादा भुसेंवर ताडी अड्ड्यावर धाड टाकण्याचा प्रसंग ,राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निष्काळजीपणा

0
58

भारत पवार : मुख्यसंपादक.                                   पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क : ९१५८४१७१३१.                  मालेगाव : कटा महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव महानगरात कुत्ता गोळीने शिरकाव केल्याचे येथील नागरिकांना समजताच अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त करून संताप व्यक्त केला आहे.याबाबत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहेच.अशातच आज मंगळवार दि.५ फेब्रुवारी ०२४ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी येथील मोसमपुला शेजारील ताडी अड्ड्यावर अचानक छापा टाकण्याचा बाका प्रसंग ना.भूसेंवर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर दादा भुसे यांनी मात्र संताप  व्यक्त केला आहे.

याबाबत महाराष्ट्र न्यूज च्या हाती मिळालेली माहिती अशी की , मालेगाव येथील मोसम नदी वरील विकास कामांची पाहणी करण्यासाठी मंत्री दादाजी भुसे गेले असता नदी किनारी लगतच्या सपाटीवर असलेल्या ताडी अड्ड्यावर ताडी शौकिनांची मोठी गर्दी मंत्री भुसे यांना पहावयास मिळाली त्यामुळे त्यांनी तात्काळ ताडी अड्ड्यावर अचानक धाव घेत छापा टाकल्याने अनेकांची भंबेरी उडाली तर काहींची नशाच उतरली त्यामुळे मोठी पळापळ सुद्धा पहावयास मिळाली.

यावेळी ताडी अड्ड्यावर संशयास्पद सफेद पावडर मिळून आल्याने भेसळीचा संशय व्यक्त केला जात आहे.भुसे यांनी छावणी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि येथील राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस अधिकारी यांना फोन करून बोलवून घेतले त्यामुळे मोठाच पोलिसांचा फौज फाटा जमला होता. मंत्री दादा भुसे यांचेवर ताडी अड्ड्यावर धाड टाकण्याचा बाका प्रसंग ओढवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे तर राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस अधिकारी आणि छावणी पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी निष्काजीपणाचा आव आणल्याचे दिसल्याने त्यांचे विषयी सुद्धा मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान ताडी अड्ड्यावर संशयास्पदरित्या सापडलेली  सफेद पावडर व ताडीने भरलेल्या बियर सारख्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. ताडी व संशयास्पद मिळालेली सफेद पावडर मुंबई येथील लॅब मध्ये तपासण्यासाठी पाठवण्यात येणार असून तेथील अहवाल आल्यावर सफेदी काय रंग आणते ? हे पाहून ताडी दुकानदार मालक श्री अण्णा यांचेवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व राज्य उत्पादन शुल्काचे येथील अधिकारी यांनी संयुक्तरित्या बोलतांना सांगितले.

मालेगाव महानगर पालिकेची कुठलीही परवानगी न घेता मोठ्या दादागिरी दुकान मालक श्री अण्णा यांनी दुकानाच्या पुढील भागातील रिकाम्या जागेवर पत्र्याचे शेड बांधून अतिक्रमण केले होते. त्यामुळे येथील महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दाखल घेत त्या पत्र्याच्या शेड वर बुलडोझर फिरवल्याने शेड जमीनदोस्त केले. ताडी अड्ड्या बाबत येथील रहिवाशांनी तक्रार छावणी पोलिसात दाखल केली होती त्याप्रमाणे पोलिसांनी नुकतीच समज दुकान मालकांना दिल्याचे बोलले जात आहे तर ताडी अड्ड्यात आंबट शौकिनांची होणारी गर्दीमुळे स्थानिक रहिवाशांना खूपच त्रास होत असल्याचे यावेळी स्थानिकांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here