दिवाण पाटील यांचा अभिलाल देवरे यांनी केला सत्कार

0
25

भारतराज पवार : मुख्य संपादक.                             धुळे,नाशिक जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क  मो. ९१५८४१७१३१ 

धुळे : कटा.महाराष्ट्र न्यूज  वेब चॅनल : धुळे जिल्ह्यातील निकुंभे गावातील जनसेवक तसेच आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे धुळे तालुकाध्यक्ष दिवाण देवचंद पाटील यांची एस.एम.एफ.जी बँक फायनान्स धुळे दत्तमंदिर शाखा या ठिकाणी ग्रुप क्रेडिट अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष -अभिलाल दादा देवरे  यांनी दिवाण देेवचंद पाटील यांचा सत्कार केला, त्या प्रसंगी आदर्श मल्हार सेनेचे पदाधिकारी संजय महाराज गिरासे व सर्व पदाधिकाऱ्यांकडून दिवान पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाची पहिली शाखा दिवान पाटील यांच्यासह सर्व मित्रांंच्या सहकार्यातून निकुंभे ता.जि.धुळे येथे करण्यात आली होती, त्या दिवसापासून निकुंभे गावातील जनतेचे आरोग्यविषय व रक्त उपलब्ध करून देणे, अशाच प्रकारे गोरगरिबांचे छोटे मोटे सामाजिक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून दिवान पाटील सोडवत राहतात, असा आदर्श कार्यकर्ता आज बँकेत अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल अभिलाल दादा देवरे व सर्व पदाधिकाऱ्यांकडून दिवान पाटील यांचे  कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here