चोरीस गेलेला मोबाईल महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या पुढाकाराने मिळाला परत

0
39

भारतराज पवार : मुख्य संपादक                               आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी आणि पत्रकार नियुक्ती साठी संपर्क:.मो.९१५८४१७१३१

मुंबई :  संजय बोर्डे : मोबाईल अशी वस्तू आहे एकदा चोरीस गेला तर सापडत नाही.मग पोलिसांकडे तक्रार करा की नका करू मोबाईल मिळणे अवघड असते.परंतु ह्या घटनेस अपवाद ठरले ते मुंबईतील आमचे महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल चे कार्यकारी संपादक संजय बोर्ड व महारष्ट्र पत्रकार असोसिएशनचे मुंबई महासचिव मेहुल पवार ....

गोराई बोरीवली मुंबई येथे राहणारे व्यापारीहिरजी बुधरिया हे रिक्षाने प्रवास करत असताना त्यांचा मोबाईल एका रिक्षा चालकाने चोरून नेला होता.
मदतीसाठी त्यांनी महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे मुंबई महासचिव मेहुल पवार यांना संपर्क केला व मेहुल पवार यांनी संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांना संपर्क करून सर्व कहानी सांगितली. संजय बोर्डे यांनी त्वरित एम एच बी पोलिसांना संपर्क करून सविस्तर कहानी सांगून मोबाईल मिळवून देण्याची विनंती केली. त्यानुसार एम एच बी पोलीस स्टेशनचे पीएसआय अतुल वाघोले यांनी त्वरित सूत्र हलवली व चोरीला गेलेला मोबाईल अर्ध्या तासांमध्ये मिळवून दिला. त्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन ने पी एस आय वाघोले यांचे मनापासून स्वागत केले.त्याचबरोबर हिरजी भाई यांनी पोलिसांचे आभार मानले. महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन नेहमीच पत्रकार च्या न्याय हक्कासाठी लढणारे संघटन आहे व गोरगरिबावरती अन्याय अत्याचार होत असेल शासन प्रशासन दखल घेत नसेल तर सामान्य जनतेस न्याय मिळवून देण्याचे कार्य करत असते .त्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन चे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे. कौतुक होत आहे आपणास सुद्धा काही गरज पडल्यास आपण महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन च्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी 8652274580 ह्या नंबर वर संपर्क करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here