पत्रकारांनी सरकारला धारेवर धरले ! मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या सर्वच मागण्या केल्या मान्य

0
46

भारतराज पवार  : मुख्य संपादक                             नव्याने पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१                                            मुंबई : संजय बोर्डे : अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आलेल्या सरकारला पत्रकारांनी धरले धारेवर ; पत्रकार सन्मान योजनेबद्दलचा असंतोष उफाळून आला .

महाराष्ट्र विधानमंडळात आज जाहीर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभुराज देसाई, संजय बनसोडे हे अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडल्यानंतर विधानभवनातील पत्रकार कक्षात आले. राज्यातील सर्वच घटकांना न्याय देणारा अंतरिम अर्थसंकल्प असल्याची स्तुतीसुमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या वर उधळीत असतांनाच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दिशेने गेले. सर्व घटकांना न्याय मिळाल्याचे आपण सांगताहात परंतु पत्रकारांना न्याय मिळालेला नाही, अशा शब्दांत जोरदार तक्रार केली. त्याबरोबर सर्वच पत्रकारांनी असंतोष व्यकत करीत मे २०२३ मध्ये देण्यात आलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. शासन निर्णय निघालेला नाही. शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दोन दिवसांत जी आर निघेल असे सांगितले पण दोन अधिवेशने होऊनही जी आर निघालेला नाही, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. किरण नाईक, शीतल करदेकर आदी पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडे पत्रकारांना तत्काळ न्याय देण्यासाठी जोरदार आग्रह धरला अखेर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here