रात्रीचे तीन वाजले जमिनीचे अंथरूण काय हा वनवास लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने

0
108

भारत पवार  : मुख्यसंपादक                                    आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो. ९१५८४१७१३१                              देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  रात्रीचे तिन वाजतायेत, शेतातील द्रुष्य आहे थंडी एवढीय की तापमान १० /११ डिग्री सेल्सिअस, झोपायला जमिनीचंच अंथरूण व पांगरायला,एक रग आणि शाल पांघरली तरी गारवा लागायचा कमी होत नाहीये. हुडी हुडी भरलीय रात्रीचे साडेतीन वाजलेत.हे द्रुष्य बघुन अक्षरशः अंगावर काटा उभा राहतोय, समाजातील सर्व तरुण, महिला, जेष्ठ नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत, छगन भुजबळ सारख्या जबाबदार व्यक्तीला मराठ्यांची ही संख्या व विधारक द्रुष्य दिसत नाही का? डोळ्यांवर मराठा द्वेषाची पट्टी बांधून एल्गार मेळावे घेत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बिगवडत आहेत,आज मुंबईकडे निघालेल्या मराठा मोर्चात गांवखेड्यातील विविध समाजातील तरुण सहभागी असल्याचे दिसून येत आहे, वेगवेगळ्या धर्माचे लोक या मोर्चात सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या सेवेसाठी तत्परतेने काम करत असल्याचे दिसून येत आहे, विशेषतः मुस्लिम समाजाच्या वतिने पाणी व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत .

वयाची साठी ओलांडलेल्या आमच्या माय माऊल्या आत्ता मातोरी गावात थंडीच्या कडाक्यात जमिनीवर,अक्षरशः ढेकळावर शरीर आकडून झोपल्यात. हे दृष्य पाहून झोपच उडून गेलीय. जमेल तसे मुंबईकडे निघालेले २५ ते ३० लाख मराठे असंच जमल तसं उघड्या आभाळाकडे बघत झोपले असतीत.

सततच्या उपोषणमुळे तबियत साथ देत नाही, दिवसभर उभा रहाव लागणार आहे. चालावं लागतं आहे,पुन्हा उपोषणाला बसावे लागणार आहे. पाई मुंबईला जायचे सोपे काम नाही. हे माहीत असताना मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करतात. अनेक महिन्यापासून न भेटलेली पत्नी रस्त्यात औक्षण करायला येते. लेकर आडवी थांबलेली असतात. दुरून बापाला नेहाळतात. जवळ येतात, गळ्यात पडतात. लेकीचे डोळे भरून येतात. अश्रूंचा अभिषेक होतो. लेकरू छातीला लावले की पाटलाची अवस्था काय झाली असेल. अनेक महिने न पाहिलेले लेकर मिठीतून सोडताना काय वेदना होत असतील. पण या वेदना बाजूला सारून ते समाजाच्या वेदना घेऊन मुंबईसाठी पुढचे पाऊल टाकतात. हे सगळं बघताना माणूस असलेल्या माणसाच्या डोळ्यात नकळत पाणी येते. प्रश्न फक्त इतकाच आहे, सरकारमधे बसलेल्या लोकांत माणूसपण शिल्लक असेल की नाही?
*कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here