नोकर भरतीच्या विरोधात पत्रकार सुभाषचंद्र बोराडे यांचे बेमुदत उपोषण सुरू

0
64

भारत पवार , मुख्यसंपादक                                      मो.९१५८४१७१३१

मुंबई : महाराष्ट्र न्यूज  वेब न्यूज चॅनल   संजय बोर्डे –

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन!
या संस्थेचे वतीने मां. सुभाषंचंद्र बोराडे सो. (पत्रकार- कल्याण)यांनी गुरुवार दिनांक १८.०१.२०२४ रोजी
” डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ,कल्याण (प)” येथे आपल्या कार्यकर्त्याना घेऊन ” महाराष्ट् शासन आऊटसोर्संग ने नोकरभरतीच्य विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आजपर्यंत विविध शासकीय कार्यायांमध्ये हजारो पदावर मागासवगीर्य उमेदवाराचा बॅक लोग अस्तित्वात असताना सुद्धा आऊटसोर्संग ने नोकरभरती करणे हे मागासवगीर्य उमेदवारावर अन्याय झाला आहे.

त्यांनी अतिशय महत्वाच्या प्रश्नावर बेमुदत उपोषण सुरू केले असल्यामळे त्यांना विविध लोकांकडून उत्सफूर्तपणे सहकार्य लाभत आहे शासनाकडून उपोषण मागे घेण्याच्या संदर्भात
तहसीलदाराचे प्रतिनिधी मंडल अधिकारी आयु संजय पतंगे व अधिकारी वर्ग येऊन गेले त्यांनी उपोषण कर्त्यांना विनंती केली आपण उपोषण मागे घ्यावे आम्ही शासनाला कळवतो
परंतु शासनाचा संबंधित प्रतिनिधी चर्चेला आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणार्थी
सुभाष दादा बोराडे यांनी घेतली.आपल्या विचारांशी ठाम आहे जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही उपोषणाला समर्थन देण्यासाठी
विविध नागरिक व कार्यकर्ते आयु शिवाजी निकम , संजयजी जाधव, माजी नगरसेवक भीमराव डोळस , ललित हुमणे, दीपक वानखेडे ,अशोक क्षीरसागर ,राजू रणदिवे ,तुकाराम पवार, उमा शिंदे ,पवन खरात ,सोमनाथ भोसले, विजय कांबळे ,महिंद्रा ओव्हाळ, दामू काउतकर, लहू पाटील ,सतीश गवळी, भाई विक्रम खरे , यशवंत शिंदे , ऍडव्होकेट प्रवीण बोदडे , विविध संघटना व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी येऊन सुभाष दादा बोराडे यांना समर्थन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here