जनविकासासात रममान असणारा माजी सरपंच मोतीराम शेवाळे यांचे निधन, रविवारी दशक्रिया

0
65

भारत पवार : मुख्यसंपादक.                                     आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१.                                      देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी येथील रहिवासी मोतीराम धोंडू शेवाळे यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले.त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि. २१ / १ / ०२४ रोजी स.१० वा.त्यांच्या राहत्या घरी असल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले.

मोतीराम शेवाळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संसाराचा गाडा ओढत असताना माळवाडी व फुलेमाळवाडी ह्या दोन गावगाड्यांचा गाव विकासाचा दोर त्यांनी हाती घेतला होता. त्याकाळी वरील दोन्ही गावांची एकच ग्रामपंचायत होती.घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा त्यांनी राजकारणात उडी घेतली.आणि पहिल्याच प्रयत्नात ते निवडूनही आले.विशेष म्हणजे सरपंच पदाच्या रेस मध्ये त्यांनी रस घेतला आणि निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.तेव्हा त्यांनी दोघा गावविकासाचा गाडा व्यवस्थित हाकलला.असा जनविकासात रममान असणारा अवलिया शुगर आजाराने ग्रासला हिम्मत न हरता त्यांनी शुगर आजाराला काही अंशी बाजूला सारून ९१ वर्षाला गवसणी घालून गेल्याने सर्व्याना हळहळ वाटत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी , एक भाऊ,तीन मुल, सूना , नातवंडं असा मोठा परिवार आहे.

महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल आणि पवार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली….                                   शब्दांकन : भारतराज पवार , मुख्यसंपादक तथा महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन राज्य उपाध्यक्ष , मुंबई.मो. ९१५८४१७१३१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here