एका गांधीच्या बदल्यात आपल इमान विकतात ! शेतकरी, कष्टकऱ्यांच्या श्रमाचे ,मताचे “मोल ” मातीमोल का करतात ? अभि.कुबेर जाधव

0
99

भारत पवार : मुख्य संपादक.                                    नव्याने पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो.९१५८४१७१३१                                                  देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क 

शेतकरी वर्ग हा आपल्या हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला दिर्घकाळ स्विकारत नाही.त्यांच्याशी कायम फटकुन वागतो, शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या जागतिक किर्तिच्या शरद जोशी सारख्या नेत्याला ही शेतकऱ्यांनी निवडणुकीत पराभूत केले, मागिल लोकसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपये उस उत्पादक शेतकऱ्यांना मिळवुन देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या
राजू शेट्टींनाही जाती पाती च्या लोकांनी राजकारण्यांच्या नादाला लागून पराभुत केले,
शेतकरी आणि श्रमिक कामगार हे कष्ट करतात.परंतु फारसा अभ्यास व राजकीय विचार करीत नाहीत. अभ्यास तर मुळीच करीत नाहीत.त्यामुळे आपले दिर्घकाळ आर्थिक हित कोण करू शकतो?,हेच ओळखत नाहीत.
कोणत्याही देशात, राज्यात, बुद्धीमान, हुशार, ज्ञानवंत, नीतिमान लोक प्रगती करीत असतात.या बाबतीत शेतकरी आणि श्रमजीवी खूप मागे राहतात .काळ पुढे जात असतो,.त्या काळासोबत शेतकरी आणि कष्टकरी जनता धावू शकत नाही,
शेतकरी हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राहातो.जो कोणी नोकरी करतो.लबाडी करतो.गावात येऊन तरूणांना दारू पाजतो.मटन खाऊ घालतो.तोच त्यांना आवडतो.व भावतो,जो नोकरी करतो.प्रामाणिक पणे पगार घेतो.गावात येवुन.दारू मटन न देता शहाणपणाच्या दोन गोष्टी सांगतो.तेंव्हा तरूण म्हणतात,हे आम्हाला तुम्ही सांगता ते काही समजत नाही.डोक्यावरून जाते.मेंदूला ज्यास्त तान नका करून घेऊ.काही खायचे प्यायचे असेल तर ते सांगा.फुकटचे तत्वज्ञान नका पाजळु,. राजकीय नेते खेड्या पाड्यात भाषणाला श्रोते आणण्यासाठी स्वतः ची किंवा भाड्याची वाहने पाठवतात.मंडप टाकून जेवण देतात.तेंव्हा तेथे आधिकतम शेतकरी आणि कामगार हजेरी लावतात.नोकरवर्ग आणि व्यापारी, कारखानदार, लबाडांची भाषणे ऐकत नाहीत.ते अशा राजकीय पुढाऱ्या कडून मिळणाऱ्या जेवणावर अवलंबून राहात नाहीत.
कामगार लोक आधिकतम शहरातील बाहेरच्या भागात दाट वस्तीच्या ठिकाणी राहातात.तेथे रस्ता पाणी,विज, आरोग्य सुविधा नसते.तेथे निवडणुका लागल्या म्हणजे सर्व पक्षांचे उमेदवार येतात. व्हेज,नानव्हेज , दारू पार्ट्या ंचे आयोजन केले जाते, श्रमिक कामगार त्याचा लाभ घेतात.पुढाऱ्यांची स्तुती करतात.त्याचेकडून पैसे घेतात. एका गांधीच्या बदल्यात  आपल इमान विकतात ,त्याला मतदान करतात.तो निवडून आला कि पांच वर्षे यांच्या वार्डातील रस्ते,पाणी ,गटार,वीज या वरील निधी पुढारी परस्पर हडप करतात..*गणपती उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती, सामुदायिक विवाह सोहळ्यात ला हजेरी लावून देणगी देतात.त्याचे बैनर झळकवली जातात,.कपाळावर भगवा, निळा, जांभळा टिळा!,गळ्यात तुळशी माळा, दाढी, दोन्ही हातांच्या बोटात चार पांच अंगठ्या. त्याचा राजबिंडा चेहरा बघुन,लोक त्यांना देव समजू लागतात*.तो नाच गाण्याचा इंतजाम करतो.लोक मद्य धुंद होऊन नाचतात.यालाच ते जिवन समजतात.यालाच ते सांस्कृतिक कार्यक्रम समजतात.सांगा ,कसा होईल विकास?कोण करील विकास?ज्यांना विकासाची माहिती आणि महत्व नसेल तर!
शहरातील अशा दाट वस्तीत आधिकतम गुंड, गुन्हेगार प्रवुत्तीचे लोक निवडून येतात. तेच पुढे महापौर, उपमहापौर स्थायी समितीचे अध्यक्ष, आमदार, खासदार बनतात कदाचित येथील लोकांची तिच पसंती असावी.ते फुशारकी मारुन सांगतात की मी कोणत्याही वार्डात निवडुन येऊ शकतो.मुद्दाम वार्ड बदलतो.पांच वर्षं मी त्या वार्डात जात नाही.मी लोकांना ओळखत नाही.लोक मला ओळखत नाहीत. तशी गरजच पडत नाही.तरीही उमेदवारी करतो.,मतदार यादी घेतो.माणसे कामाला लावतो.ते घरोघरी पैसे वाटप करतात.माझे नांव व चिन्ह हातात देतात.मी एखादा चक्कर टाकतो. तोंड दाखवतो.हात जोडतो. लहान मोठ्यांचे निवडणूक काळा पुरते पाया पडतो, त्यामुळे मी सहज मताधिक्याने निवडून येतो या महा भागाचे सहज निवडून येण्याचे गुपित मतदारांच्या मुर्खपणात दडलेले असते
.कर ( Tax) तर सर्वच रहिवासी भरतात.निधी तर सर्वच वार्ड साठी मिळतो.तर मग,या अशा दुर्लक्षित कॉलनीतील रस्ता,गटार साठीचा निधी जातो कुठे? नगरसेवक परस्पर हजम करतात.तेच पैसे गणपती उत्सव, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती ला देतात.तेच पैसे निवडणुकीत मतांसाठी वाटतात. कॉलनीतील वार्डातील रहिवाशांना कधीच प्रश्न पडत नाही कि,हा देणगीचा पैसा आणतो कोठून? नगरसेवक किंवा आमदाराने शेत,घर तर विकले नाही ना? ? वार्डातील जनतेला कळलं पाहिजे की ,हा पैसा माझ्या कॉलनीतील रस्त्यांचा , गटारीच्या बांधकामाचा आहे.तो विकासासाठी वापरण्याऐवजी उत्सव व देणगी देण्यासाठी वापरला जातो आहे,.
नोकरीत आरक्षण पाहिजे.राजकारणात आरक्षण पाहिजे.त्यानुसार आरक्षित सदस्य निवडून दिले जातात,. तेही इतर महाभागासोबत लुटीत सामील होतात.नोकरीत आरक्षण तर पाहिजे, आपली माणसे अजून वंचित का?आपण आरक्षणाचा लाभ घेतला तसा इतर आपल्या बांधवांना,वंचितांना का मिळवून देऊ नये? असं आपल्याला का वाटत नाही.*भुकेला माणूस गरजेपेक्षा जास्त जेवला कि,तो इतर भुकेल्या लोकांची भूक विसरतो.इतरांच्या भुकेची झळ आणि कळ त्याला जाणवतच नाही*.
*ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरी भागातील कामगार असेच धनदांडग्यांचे बळी ठरतात, जिल्ह्यातील असे अनेक सरपंच व सदस्य अतिक्रमण व अपहार, तिसरं अपत्य, या अशा प्रकरणी अपात्र ठरत आहेत.अजूनही अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यां निर्णया अभावी पडून आहेत. तुम्हीच सांगा,असे सदस्य आणि सरपंच कोण निवडून देतो? जनता.कसे निवडून देते? पैसे घेऊनच ना?
माणसाला मन असते.बुद्धी असते.अभ्यास करून किंवा अनुभवाने तो मत बनवतो.तसे बनवलेले मत त्याने पसंतीच्या उमेदवाराला टाकले पाहिजे.पण तसं होताना दिसत नाही एक मत म्हणजे पांचशे रूपयाचे कुपण .दहा दिवस खाण्यापिण्याचे परमीट.असा समज शेतकऱ्यांचा व श्रमिकांचा असतो..तो समज दूर झाला पाहिजे आण्णा हजारे,राजु शेट्टी अरविंद केजरीवाल सारखे अनेक समाजसेवकांनी तसा प्रयत्न केला.आजही चालू आहे.पण शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या गुळगुळीत फळ्यावर समाजसेवकांचा खडू उमटतच नाही
माझ्यासोबत असणारे सहकारी विचारतात,आपली संघटना मोठी का होत नाही? तुमचे लोक निवडणुकीत अपयशी का ठरतात,? लोकांना, माझे काम आवडते म्हणून.स्तुती करतात.तुमच्या शिवाय पर्याय नाही असे म्हणतात,फोनवर बराच वेळ चर्चा करतात..माझे अनेक पक्षातील लोक संपर्कात आहेत.पण पक्षात प्रवेश देऊन पद देण्यासाठी नांक मुरडतात,,.म्हणतात,की तुम्ही आले कि आमचे धंदे बंद पडतील, आम्हाला कोणी विचारनार नाही,.आमचे राजकारण संपेल.तुम्ही समोरच्या नेत्यांच्या भ्रष्टाचार विषयी बोलतात तेव्हा आम्हाला बरे वाटते.आम्ही जवळ येतो.पण तुम्ही आमच्या नेत्यांच्या भ्रष्टाचार विषयी बोलतात तेंव्हा आमची अडचण होते.तेंव्हा आम्ही तुमच्या पासून दूर जातो, तुम्ही दुरूनच चांगले.तुमचे आमचे संबंध चांगले,
माझा विश्वास आहे कि,चोरी,लांडी लबाडी, अपहार न करता राजकारण करता येते.पण तितका संयम, आत्मविश्वास, बाळगणे आवश्यक असते.हे ज्याला जमते तो ८०% समाज कारणात व २० % राजकारणात यशस्वी होतो,.,  ्कुबेर जाधव _ समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना.मो नंबर ्९४२३०७२१०२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here