जिल्ह्याला हक्काचा भिडू मिळाला ,अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी किरण सोनवणे यांची नियुक्ती , जिल्ह्यातील कलावंतांच्या प्रश्नांची वाचा फोडण्यासाठी आता लढा देणार प्रहार : किरण सोनवणे

0
148

भारत पवार  : मुख्य संपादक 

नाशिक  : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  नाशिक जिल्ह्यातील कलावंतांच्या प्रश्नांची वाचा फोडण्यासाठी आता लढणार प्रहार असे मत नवनियुक्त नाशिक जिल्हाध्यक्ष किरण सोनवणे यांनी.महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.जिल्ह्यातील ज्या कलवंताना समस्या भेडसावत असतील त्यांनी आपल्याशी संपर्क करावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

जी व्यक्ती आपल्या अभिनयातून अनेक विविध अंगी रुपे सादर करते…आणि त्यातील भावना त्यांच्या अभिनयातून आपल्यापर्यन्त पोहोचवण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तिस कलाकार म्हणतात…
एखादा चांगले-वाईट अभिनय करुन वेगवेगळ्या पात्रात भूमिका बजावत असणाऱ्यास आपण कलाकार म्हणतो…
ज्या व्यक्तीच्या अंगी विभिन्न कला असणाऱ्यास कलाकार संबोधले जाते… नाटकाच्या रंगमंचावर तो अनेक जिवन जगत असतांना अनेक पात्र रंगवत आसतो आणि प्रेक्षकांच्या एका टाळीसाठी भुकेला असतो.माणसाचं आयुष्य दाखवता दाखवता त्याचच आयुष्य हरवुन गेलेलं आसतं. खर्या जिवनाच्या रंगमंचावर मात्र तो सतत संकटाच्या वाटेवर चालतांना दिसतो.अनेक समस्यांना तोंड देत देत तो जगाला हसवत असतो आणि त्यांच दुखं विसरायला लावत असतो.परंतु याच कलाकारांच्या दु:खाला दुर करण्यासाठी अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना अनेक वर्षापासून या कलावंताच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या माध्यमातून कलाकारांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवून त्याची मदत करुन कलेचा वारसा जिवंत रहावा या साठी कार्य केले जाते. बच्चु भाऊ कडु आज उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. एक दबंग आमदार आणि वेळी आक्रमक नेते, जनसामान्याचा अपना भिडु बच्चु कडु अशी ज्यांची ख्याती . याच बच्चु भाऊंची हि अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना सध्या अखंड महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातील कलाकारांना उभी करुन त्यांच्या साठी लढत आहे. याच अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेची संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकारणी काल जाहीर झाली. आणि आपल्या नाशिकसाठी,अखिल भारतीय चित्रपट संघटना नाशिक जिल्हाप्रमुख म्हणुन सिनेकलावंत किरण अनिल सोनवणे (अजिंक्य)या़ंची निवड करण्यात आली आहे. किरण सोनवणे हे नाव नाशिक जिल्ह्यातील कलावंत क्षेत्रात आवर्जून घेतले जाते.कारण किरण सोनवणे हे गेली तिन ते चार वर्षापासून वेबसिरीज व सिनेमांचा खडतर आणि यशस्वी प्रवास करुन तयार झालेले सशक्त असे अभिनेते आहेत. वेबसिरीज, शाँर्ट फिल्म च्या माध्यमातून आपण बघत आलेलो आहोत. आपल्या स्वभावामुळे आणि कुणालाही क्षणात आपलेसे करुन बंधुभाव जपणार्या या किरण सोनवणे (अजिंक्य) यांची कलाक्षेत्रातील मेहनत, यश, आणि व्यक्तीमत्व यावरुन अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या नाशिक जिल्हाअध्यक्ष पदी योग्य व्यक्तीची निवड केली आणि आता आम्हाला सुध्दा अपना भिडु आणि आमच्या हक्काचा माणूस मिळाला, अशी भावना आता नाशिक जिल्ह्यातील कलावंताची झाली आहे. एकांकिका ,नाटक, राज्यनाट्य स्पर्धा, शाँर्ट फिल्म, मराठी मालिका ‘रवका’ ‘अमावस्येची रात्र’ ‘अंटी आणि बंटी’ ‘क्राईम पेट्रोल’ यासारख्या हिंदी व मराठी मालीकांमधुन किरण सोनवणे यांनी अभिनय केला आहे, ‘डायमंड ऑफ महाराष्ट्र’ ‘मिस्टर महाराष्ट्र’ ‘चांदवडी रुपया’ ‘यंग ऍक्टर के आर ए’ इत्यादी पुरस्कार देखील यांना मिळालेली आहेत. कलाक्षेत्रात असणारे किरण हे सध्या अजिंक्य महाराष्ट्र न्युज या दैनिकाचे संपादक असुन, सुराज्य महाराष्ट्र न्यूजचे मिडिया कॉर्डिनेटर कलाक्षेत्रासह ते पत्रकारिता क्षेत्रात सुध्दा उत्तम कामगिरी बजावत आहेत. किरण सोनवणे यांची मेहनत व उत्तुंग कामगीरी यामुळेच त्यांची निवड बच्चु भाऊंच्या अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी करण्यात आली आहे. एकांतरीत आता नाशिक जिल्ह्यातील तळागाळातील कलावंतांच्या न्याय हक्कासाठी किरण सोनवणे हे प्रहार चित्रपट संघटनेच्या माध्यमातून लढणार आहेत. आणि यामुळे जिल्ह्यातील तळागाळातील कलाक्षेत्रातील कलावंतांना आनंद झाला आहे. कारण नाशिककरांना सुध्दा आपल्या हक्काचा भिडु आता मिळाला आहे.

प्रहार चित्रपट संघटनेची राज्य कार्यकारणी पुढीलप्रमाणे जाहीर झाली आहे, महाराष्ट्र अध्यक्ष म्हणुन संदीप मोहीते पाटील.महाराष्ट्राचे उपाध्यक्ष:- सारंग महाजन ,राज्य उपाध्यक्ष :- अमित मुळे ,राज्य संपर्क प्रमुख :- संतोष लांडे व तेजस भंगाळे , राज्य संपर्क प्रमुख महीला :- आरती बन्सुडे मँडम व कविता गायकवाड मँडम, अशी राज्याची कार्यकारणी निवड करण्यात आली असुन. महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांच्या जिल्हाप्रमुख पदाची निवडही करण्यात आली, यामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी आता सिने अभिनेते किरण अनिल सोनवणे हे असणार आहेत.                                          नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.                                         संपर्क मो. ९१५८४१७१३१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here