
भारत पवार मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१. मालेगाव : जिल्हा बँकेच्या कर्ज प्रकरणात अटक केलेले शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना मालेगाव कोर्टाने येत्या २० नोव्हेंरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली असल्याचे हिरे यांचे वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरलेले व बँकेस फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळ येथून अटक करून आज ११ वाजता मालेगाव कोर्टात हजर केले.
यावेळी हिरे यांचे वकिलांनी कोर्टात बाजू मांडताना सांगितले की सर्व कागद पत्र जप्त करण्यात आले असून चौकशी सुद्धा करण्यात आल्याने अद्वय हिरे यांना जमीन मंजूर करण्यात यावा तर सरकारी वकिलांनी यावेळी सांगितले की, हिरे यांची प्राथमिक चौकशी सुरू असून त्यांची पुढील चौकशी अजून करणे आवश्यक असल्याने त्यांना पोलीस कस्टडी देण्यात यावी असा दावा करण्यात आला.कोर्टाने दोन्ही वकिलांची बाजू ऐकून घेऊन अद्वय हिरे यांना पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रेणुका सूतगिरणीच्या नावाखाली काढलेल्या जिल्हा बँकेकडून अद्वय हिरे यांनी ७.४६ कोटींचे कर्ज घेतले होते.याची परत फेड त्यांनी न केल्याने कर्ज २५ कोटींवर गेले आहे.
