कोचिंग क्लासेसवर आकाश सुरवाडेंचा दणका, कार्यवाहीसाठी प्रशासन लवकर पुढे सरसवणार का? सवाल, क्लासेसच्या संचालकांकडून शिक्षणाचे बाजारीकरण वार्षिक दहा करोडची उलाढाल तरीही बुडविले महसूल असल्याची तक्रार

0
288

आवाज जनतेचा …शासना पर्यंत…

भारत पवार : मुख्य संपादक

पाहिजेत : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा. तसेच आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क :  मो.९१५८४१७१३१.                               

 मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव नेहमीच समस्यांनी आणि जनेच्या गर्दीने गजबजलेला असतो.त्यामुळे येथील प्रशासना बरोबरच जिल्हा जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष मालेगाव महानगर च्या घटनांकडे असते.जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादासाहेब भुसे हे खासकरून मालेगाव महानगरातलेच.त्यामुळे येथील प्रशासन नेहमीच जागृत अवस्थेत असतेच यात शंकाच नको.का ? तर दादा साहेबांपर्यंत केव्हा काय माहिती जाईल आणि आपली काय कानउघाडणी होईल हे सांगता येत नाही ? अशी समस्या येथील जागृत प्रशासनास सतावते असे जरी असले तरी मालेगावचे आकाश सुरवाडे यांनी खासगी कोचिंग क्लासेस वर दणका टाकला असून कार्यवाही साठी प्रशासन लवकर पुढे कधी सरसावणार ? असा सवालही त्यांनी केला आहे.

 

याबाबत माहिती मिळतेय की,मालेगाव शहरात सुरू असलेल्या सर्व स्तरातील कोचिंग क्लासेस वर कार्यवाही करावी अशी मागणी परिवर्तन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश सुरवाडे यांनी येथील अप्पर जिल्हाधिकारी,शिक्षण मंत्री,पालकमंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालेगाव शहरातील मोठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेस चालू असून सदर क्लासेस मार्फत विद्यार्थी व पालक वर्गाची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या संदर्भात मनपा मालेगाव शिक्षण मंडळ जा. क्र./३३८/२०२१ दि.२३/८/२०२१ आणि शिक्षणाधिकारी(माध्यमिक) नाशिक यांचे पत्र जा. क्र.१०/२०२१दि.५/१०/०२१ यावरून असे निदर्शनास येत की,शहरातील सुरू असलेले क्लासेस कुठल्याच प्रकारचे नोंदणीकृत नाही.क्लासेस मध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवतात.

 

महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी सादर संचालक खेळत आहेत क्लासेस मध्ये अग्निशामक यंत्रणा नाही उदाहरण द्यायचे झाल्यास सुरत वव दिल्ली परिसरातील क्लासेसला आग लागल्याने अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेला. असेही निवेदनात म्हंटले असून वर्षभरात जवळजवळ दहा करोड ची उलाढाल होत असून शासनाचा महसूल बुडवीत असल्याचे दिलेल्या आपल्या निवेदनात सुरवाडे यांनी म्हंटले असून आपल्या स्तरावरून चौकशी करून क्लासेसवर कार्यवाही करावी असेही म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here