
आवाज जनतेचा , शासना पर्यंत….. भारत पवार : मुख्य संपादक. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा .आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती संपूर्ण महाराष्ट्रात अगदी अल्प दरात अगदी काही सेकंदात पोहचण्या साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१. मालेगाव / निमगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : विशाल हिरे : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, निमगांव येथील हिंदी विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. राजाराम शेवाळे यांना महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. नुकतेच या पुरस्काराचे वितरण नाशिक येथील कालिदास कला मंदिर येथे पार पडले. याप्रसंगी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. व्ही. एस. मोरे, डॉ. हरीश आडके, डॉ. बी. एस. जगदाळे, डॉ. सुभाष निकम, डॉ. डी. एफ. शिरुडे प्राचार्य डॉ. उज्जन कदम तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. राजाराम शेवाळे यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ प्रशांत हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे व सर्व पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. प्राचार्य डॉ उज्जन कदम व कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालय परिवाराने, मित्र मंडळींनी अभिनंदनाचा वर्षाव करुन शुभेच्छा दिल्या.
