देवळा तालुक्यात दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा ,१०लाखांचा मुद्देमाल जप्त, अवैधरित्या असलेल्या दारु अड्याचे उखळ पांढरे

0
288

 आवाज जनतेचा … शासना  पर्यंत ..महाराष्ट्र न्यूज भारत पवार : मुख्य संपादक                                     पाहिजेत _ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहेत इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१.                                          देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारूची विक्री व उत्पादनाची गुपित ठिकाणे उध्वस्त करण्याची जबरदस्त शोध मोहीम पोलिसांनी हाती घेतले असून आतापर्यंत अनेक अवैध ठिकाणी पोलिसांनी छापा मारून गुन्हे दाखल करण्याचे सत्र अवलंबिले असल्याने दारु मालकांबरोबरच गावरान मदिरा प्राशन करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.

पोलिसांच्या या मोहिमेत अनेक ठिकाणची गावठी मदिरा आणि त्या मदिरा चे मालक हुडकून काढून गुन्हे दाखल करण्याचे सत्र चालविले आहे.

नुकतेच देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील परिसरात बनावट दारु बनविणाऱ्या  अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून बनावट अड्डा उध्वस्त केला.यावेळी दहा लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मदिरा पिनाऱ्यानी मोठी धास्ती व्यक्त केली आहे.

मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना डोंगरगाव चा परिसरात एका शेतातील   शेडमध्ये अवैधरित्या बनावट देशी व विदेशी दारू बनविण्याचा अड्डा असल्याचे माहिती मिळाली होती.त्यानुसार विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे ,हवालदार गोपीनाथ बहिरम,पोलीस नाईक संतोष थेट,पोलीस शिपाई नारायण कवर,मनोज सानप ,धनंजय देशमुख , कल्पना लाहांगे आदींनी डोंगरगाव परिसरातील कैलास अहिरे यांच्या शेतातील घराच्या मागे असलेल्या शेड मध्ये छापा टाकून कैलास अहिरे व प्रतीक कैलास अहिरे दोघं बापलेक विना परवाना बेकायदा बनावट देशी व विदेशी दारू बनवत असल्याचे आढळून आले. यावेळी दारु भरण्यासाठी लागणाऱ्या विविध कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या ,मदिरा भरण्यासाठी लागणारे मशीन, झाकणे,बाटलीचे सील दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन ,प्रिन्स ,संत्रा, इम्पेरियल ब्लू कंपनीच्या मद्य भरलेल्या २२३ बाटल्या आदींसह एकूण दहा लाख पाच हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोघा बाप लेका विरुद्ध देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.ह्याच बाप लेका विरुद्ध यापूर्वी देवळा,सटाणा,सुरगाणा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्या खाली गुन्हे दाखल आहेत.तरीसुद्धा पुन्हा तोच उद्योग करण्याचे धाडस यांच्यात का होते ? हे मात्र विचार करण्यासारखेच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here