मोठ्ठी बातमी : इस्कॉन मध्ये राधेला वृंदावनचा १.७५ लाखाचा पोशाख अर्पण

0
144

भारत पवार : मुख्य संपादक.                                    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहेत युवक_ युवती इच्छुकांनी संपर्क करा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी अवश्य संपर्क साधावा.मो.९१५८४१७१३१

 

मालेगाव / नाशिक :  कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : अनिकेत मशिदकर  – नाशिक हून 

‘हरे रामा हरे कृष्णा… राधे राधे’च्या जयघोषात इस्कॉन मंदिरात शनिवारी (दि. २३) राधाष्टमी, म्हणजेच राधाराणीचा जन्मदिन उत्साहात साजरा झाला. या उत्सवानिमित्त खास वृंदावन येथून आणलेला १.७५ लाख रुपये किमतीचा हाताने तयार केलेला पोशाख अर्पण करण्यात आला. सायंकाळी १०८ पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. २००० हून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. इस्कॉनमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर साजरा होणारा हा दुसरा मोठा उत्सव आहे.

इस्कॉन मंदिराची तसेच श्री राधा-कृष्णाच्या विग्रहांची खास फुलांनी सजावट करण्यात आली होती. त्यासाठी दोन दिवसांपासून ४० महिला सेवेकऱ्यांनी फुलांचे हार तयार केले होते. उत्सवाचा प्रारंभ शनिवारी पहाटे ५ वाजता मंगल आरतीने झाला. त्यानंतर महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद्भागवत प्रवचन, राधिकाष्टकमचे स्तवन, राधा-कृष्णाच्या विग्रहांना पंचामृत अभिषेक, महाआरती, महानैवेद्य, प्रसाद वाटप असे कार्यक्रम झाले. महोत्सवासाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, उत्सव समिती प्रमुख सत्यराज प्रभू आणि अच्युत प्राण प्रभू, सहस्रशीर्ष प्रभू, गोपालानंद प्रभू यांनी विशेष परिश्रम केले.

 

*कृष्ण जन्माष्टमीनंतरचा दुसरा मोठा उत्सव*

 

*..तर श्रीकृष्णाची कृपाप्राप्ती सुलभ*

 

राधाष्टमीनिमित्त हरिपार्षद प्रभू (मुंबई) यांचे प्रवचन झाले. ते म्हणाले, श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे अतिशय कठीण आहे; परंतु राधाराणीची कृपा एखाद्या व्यक्तीवर झाली, तर त्या व्यक्तीला श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे सुलभ होते. श्रीकृष्णाला संतुष्ट करणे हीच तिची आराधना असल्यामुळे तिचे नाव राधा आहे असा पुराणांत उल्लेख आहे. राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्यातील प्रेम भौतिक स्तरावरील नसून आध्यात्मिक स्तरावरील आहे याचे दाखले त्यांनी

शास्त्राच्या आधारे दिले.

 

*खास वृंदावन येथून आणलेला हा पोशाख हाताने तयार केलेला आहे, हे विशेष.*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here