नांदगाव मतदार संघास “विकासाची झालर” चढविणारा कणखर आ.सुहासआणा कांदे

0
141

भारत पवार  : मुख्य संपादक ” महाराष्ट्र न्यूज”           * महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या,अन्य घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क..मो.९१५८४१७१३१.                                         मनमाड / मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : भारत पवार : नांदगाव मतदार संघ गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामापासून खचून गेला होता.त्यामुळे या मतदार संघातील नागरिकांनी जगण्याची मदार सोडून दिली होती. कारण अनेक आमदार निवडून दिलेत आणि निवडून गेलेत. त्यांनी मतदार संघातील नागरिकांशी गद्दारीच केली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. का ? तर म्हणे आपल्या मतदार संघात विकास कामे करणार ,पाणी आणणार असे आश्वासने देत निवडून येत.परंतु विकास कामांचा ठण ठण आणि मतदार संघातील नागरिकांच्या नशिबी मात्र वणवण असायची.त्यामुळे विश्वास कोणावर करावा ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडायचा.तर मनमाड शहरातील समस्त नागरिक मात्र काही अंशी नाराज असल्याचे बोलले जात आहे.आणि हे सत्य आहे.हे आ.सुहास आण्णाना सुद्धा कुठेतरी खटकत असणार हे तितकेच खरे.याचे कारण सुद्धा तसेच आहे. पुढे मी ते कारण नक्कीच सांगणार आहेच.                                                आज काही अपवाद वगळता मनमाड शहर सुद्धा विकासाची कात टाकत आहे.या शहरास गेल्या अनेक वर्षांपासून बकाल स्वरूप प्राप्त झाले होते.मग रस्त्यांची समस्या असो की राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्यांची समस्या असो यासारख्या अनेक समस्या खीचप पडल्या होत्या.त्या सोडविण्याची धमक कोणात दिसली नाही मात्र या समस्यांना अपवाद ठरलेत आजचे कणखर नेतृत्व आमदार सुहासआणा कांदे .सुहासआणानी राजकारण न करता सामाजिक विकाससास महत्व देत नांदगाव मतदार संघात विकास कामांची झालर चढविण्यास भर दिला.मनमाड शहरातील मुख्य रस्ता,नांदगाव पर्यंतचा रस्ता, नांदगाव तालुक्यातील अनेक गावातील रस्ते, पाणी समस्या सोडविण्यासाठी कायम प्राधान्य देत राहीले.संघात अनेक विकास कामांची झालर चढवलेली असल्याचे दिसेल.मालेगाव नाका तर थेट नांदगाव शहरा पर्यंतचे  हाय वे वरील स्ट्रीट लाईट रात्री सुरू असतात त्यामुळे रात्री अक्षरशः दिवस असल्या सारखे जाणवते.मालेगाव नाका पासून तर मनमाड बस स्टँड पर्यंत तसेच मालेगाव नाका पासून तर चांदवड हाय वे मनमाड हद्द पर्यंत स्ट्रीट लाईट रात्रीच्या वेळी कायम साठी सुरू करावी अशीही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.तर शेवटी शेवटी तरी आमदार सुहासआणा नी मनमाड वासियांसाठी पाण्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष घालून पाणी समस्या तात्काळ सोडविण्यासाठी आपले कणखर नेतृत्व पणास लावले तर मनमाड वासियांची घशाची कोरड नक्कीच थांबणार अशी अपेक्षा मनमाड शहरातील समस्त जनतेने व्यक्त केली आहे.आज पावसाळ्यात  सुद्धा मनमाडच्या जनतेस पिण्याचे पाणी २१ दिवसांच्या पुढे येत असते.उन्हाळ्यात किती वाईट स्थिती राहत असणार ? हिच मोठी शोकांतिका आहे. हे सुद्धा आणांनी जाणून घेणे गरजेचे आहे.आमदार सुहास आणांचे नेतृत्व हे थांबणारे नेतृत्व नाही मनमाड वासियांचे राजकारण पिण्याच्या पाण्या भोवतीच आजवर फिरते आहे. आणि ह्या पाणी समस्येवर अनेक उमेदवार निवडून येऊन त्यांनी आपल्या कार्यकाळात मलिदा खाऊन येथील जनतेचा विश्वास घातच केलेला आहे हे आ.सुहासआणा कांदे जाणून आहेत.त्यामुळे येथील जनतेची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी त्यांचा प्रयत्न जोरदार सुरू असणारच परंतु आमदार कांदे साहेब यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळास काही महिने शिल्लक आहेत तरी पाणी प्रश्न आजही पेटलेलाच का ? कुठे मांजर आडवं जाते ? हेच कळत नाही.तरी याकामी आण्णांनी जोर धरून मनमाड वासियांचा पिण्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवून इतिहास करावा अशी मागणी घशास कोरड पडलेल्या समस्त त्रस्त नागरिकांनी केली असून पाण्यासाठीचा “भगीरथ” आ.सुहासआण्णा कांदे च ठरोत. अशी अपेक्षा येथील नागरिकांनी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज शी बोलताना व्यक्त केली.                __ भारत पवार, मुख्य संपादक.                                       मो.९१५८४१७१३१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here