माझा पाणीदार नेता…भावी आमदार केदानाना आता ….!! जिल्हा अध्यक्ष असताना भाजपा घराघरात पोहचवली आज सगळ्यांच्या मनामनात रुजली…!!!

0
92

( दिल खुलास असलेला माझा पाणीदार नेता केदानाना आहेर… )

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा. मो.९१५८४१७१३१ 

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क ( २७ ऑगस्ट रोजी केदा आहेर यांचा जन्मदिन विशेष लेख ) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील देवळा गावचे रहिवासी असलेले परंतु रहिवासी ह्या शब्दाला छेद देत चांदवड – देवळा तालुक्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले गेलेले केदा आहेर उर्फ नाना यांचा उद्या रविवारी २७ ऑगस्ट रोजी जन्मदिवस अर्थात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे.यास कारणही साजेसे असल्या मुळे जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात देवळा तालुक्यातील समस्त कार्यकर्त्यात मोठा जोश निर्माण झाला आहे.त्यांचा हा जोश पाहून न भूतो न भविष्यती असे वाटू लागले आहे. या दिवशी अनेक कार्यक्रमांची रेलचेल दिसणार आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी माझे मित्र परिवारातील खास असे संभाजीदादा आहेर,भाजपा युवा मोर्चा देवळा तालुका अध्यक्ष योगेशनानु आहेर, अतुलजी ( मम्या) पवार , मनु आहेर,किशोर आहेर,जितूअण्णा आहेर, बेरोजगार युकांचे आशास्थान भाऊसाहेब पगार ,नरेश सुधागोनीवार, संजय कानडे, विजय कानडे बंधू ,उल्हास गूजरे त्याचप्रमाणे अभिष्टचिंतन सोहळा समिती मेहनत घेत आहे.

केदानाना आहेर भाजपा जिल्हाध्यक्ष पदी असताना त्यांनी चांदवड ,देवळा तालुक्यातील गावागावात जाऊन तळागाळातील तरुणांना भेटून त्यांच्यात कामाची ऊर्जा निर्माण केली.भाजपा साठी त्यांनी अंगमेहनत करून तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यकर्ते तयार केलेत.गल्ली बोळात भाजपा पक्ष निर्माण केला.अर्थात नाना भाजप जिल्हाध्यक्ष असताना नाशिक जिल्ह्यात झळाळी निर्माण केली.अनेक दीन दुबळ्या जनतेची ,तरुणाची कामे केदा आहेर स्वतः करून देत असतात.जर कधी पक्षाच्या खास कामानिमित्ताने केदानाना बाहेर असतील आणि कदाचित एखाद्या बेरोजगार असो किंवा कोणताही अनोळखी नागरिक असो त्याचे काम अडले तर ..? तर तो व्यक्ती किंवा नागरिक आज पर्यंत नाराज होऊ दिला नाही त्यांचे काम करण्या साठी केदा आहेर यांनी टीम तयार केली आहे.त्या टीम मधील कोणी येकास नानांनी फोन करून सांगितले की,त्या तरुणाचे किंवा त्या माणसाचे काम करून द्या.आणि झालेच पाहिजे तर लगेचच त्या ठिकाणी तो कार्यकर्ता पोहचतो आणि काम करूनच देतो.मग अडलेली व्यक्ती नाराज न होता हसत मुखाने घरी जातो. हिच खरी केदा नानांची कामाची लकब आहे. नाना फार तर हक्काने कार्यकर्त्यांवर चिडतील पण काम घेऊन येणाऱ्यांवर चिडत नाही काम करून देणारच हा त्यांचा आजवरचा इतिहास आहे.त्यामुळे नाना आज चांदवड – देवळा तालुक्यातील जनतेच्या,तरुणाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. हे त्यांच्या जन्मदिवसाच्या कार्यक्रमांच्या आणि समस्त मित्र प्रेमींच्या रेलचेली वरून दिसतेच आहे.देवळा आणि चांदवड तालुक्याला वैभव प्राप्त करून द्यायचे झालेच तर केदा आहेर यांचे शिवाय पर्याय असू शकत नाही.हे सुद्धा सुज्ञ नागरिकांनी ,तरुणांनी लक्षात घेण्यासारखे आहे.वेळ गेलेली नाही वेळ येणार आहे त्यामुळे संधीचे सोने करण्या साठी आता पडूनच खंबीर पणाने मजबूत पने केदानाना आहेर यांच्या पाठीशी असणे गरजेचे आहे.गेल्या दहा वर्षांपासून डॉ.राहुलदादा आहेर आमदार म्हणून आपणास लाभले त्यामुळे राहुलदादा आणि सोबत केदानाना ह्या जोड गोळीने चांदवड व देवळा तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान देत आहेत.याही पुढे जाऊन जर बेरोजगार युवकांना,गावातील नागरिकांना गाव विकासाची झालर पाहिजे असेल तर केदानाना आहेर यांच्या शिवाय पर्याय नाही.जिल्हाध्यक्ष पदी असताना नानांचे कार्य जोमात असल्या कारणाने वरिष्ठ पातळीवरून नानांच्या कार्याची  दखल घेत भाजपने अगदी अलीकडे केदानानास पक्षात बढती देत नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली.हे देवळा आणि चांदवड तालुक्यातील जनतेस भूषणावह बाब म्हणावी लागेल.असा तरुण तडफदार उमदा पाणीदार माझा नेता केदानाना भावी आमदार आता ….! अशी म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.ह्या संधीचे सोने समस्त कार्यकर्त्यांनी गाफील न राहता संयमाने केलेच पाहिजे हा संदेश मी माझ्या समस्त कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल आणि क स मा दे टाइम्स ह्या वृत्तपत्राच्या वाचकांसाठी देत आहे.

केदा आहेर यांच्या जन्मदिनाचे अर्थात वाढदिवसाचे औचित्य साधून देवळा – चांदवड  तालुक्यातील नागरिकांसाठी ,तरुणांसाठी अनेकविध कार्यक्रमांची मांदियाळी अभिष्टचिंतन सोहळा समितीकडून ठेवण्यात आली आहे.यात निराधार महिलांना त्रंबकेश्वर येथील दर्शन , सप्तशृंगी माता दर्शन ,देवळा येथील रेणुका माता मंदिरात महाआरती, देवळा रोटरी क्लबच्या वतीने आय लव्ह देवळा लोगोचे अनावरण ,विशेष म्हणजे केदानाना आहेर मित्र मंडळाच्या जनसेवा कार्यालयाचे उद्धघाटन ,महिला बचत गट मेळावा,आशा सेविकांना साडी वाटप, शेतकऱ्यांना आंब्याच्या रोपांचे वाटप केले जाणार आहे ,देवळा मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर,अंध बांधवांना मोबाईलचे वाटप, दिव्यांगांना कुबड्या काठी वाटप यांसह अनेक कार्यक्रमांची रेलचेल ठेवली आहे.तर केदा आहेर सायंकाळी ५ ते ७ वाजता देवळा महाविद्यालयाच्या प्रांगणातील मंडपात नागरिकांच्या सदिच्छा भेटी साठी उपस्थित राहणार आहेत. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे भेटीस येणाऱ्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे हार,फुल,गुच्छ आनू नयेत असे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीकडून करण्यात आले आहे.

तर माझे हक्काचे मित्र अर्थात नेता केदानाना आहेर हे उमलत नेतृत्व अधिकच उमलत जाऊन त्यास बहर यावी अशी माझ्या कडून,माझ्या पवार परिवाराकडून तसेच कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज  ह्या वेब चॅनल परिवारा तर्फे तसेच क स मा दे टाइम्स वृत्तपत्र परिवार तर्फे जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो….  भारतराज पवार : मुख्य संपादक :      महाराष्ट्र न्यूज  , प्रदेश उपाध्यक्ष _ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती , जिल्हा कार्याध्यक्ष _ माहिती अधिकार का.महासंघ .मो.९१५८४१७१३१

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here