केंद्र सरकारने घेतलेला निर्णय मागे घेऊन बळीराजास दिलासा द्यावा !

0
91

भारत पवार : मुख्य संपादक  : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.संपर्क : ९१५८४१७१३१ 

लोहनेर/ देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र  न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : शेतकरी राजाला आतां कुठे १८००, २००० चा भाव मिळण्यास सुरुवात झाली होती  तेवढ्यात सरकारने कांद्याच्या बाजार उठवला??…
केंद्र सरकार कडे विनंती आहे हा निर्णय मागे घ्यावा आणि शेतकऱ्यांना तुटपुंज्या भाव मिळत होता तो मिळु द्यावा करण शेतकरी हा शेतीत आपल्या कष्टाचा पैसा आधी ओतून पिक लावतो ४ महिने पिक पिकवतो त्यांत जर निसर्गाने वक्रदृष्टी केली तर आत्महत्ये शिवाय दुसरा मार्ग नाही… आणि निसर्ग  जर मेहरबान झालाच तर पिक काढून चांगला भाव मिळेल ह्या आशेने पिक साठवले जाते आणि ४,५ महिने साठवले पिक बाजारपेठेत नेले तेव्हा कुठे भाव मिळाला आणि आपण जर सरकारच्या माध्यमातून निर्यात शुल्क वाढवुन शेतकऱ्यांना दोन पैशाचा होणारा फायद्याचा आपल्या माध्यमातून बाजार उठवायचा हे काय योग्य नाही…
बऱ्याच लोकांन कडून ऐकले आहे , पुस्तकात वाचले आहे की हिंदूस्थान हा कृषीप्रधान देश आहे पण ह्यांच कृषीप्रधान देशात जो शेतकरी सरकार कडुन एक रुपयांचा निधी पिक लावण्यासाठी, ना काढण्यासाठी, ना साठवण्यासाठी मागतो त्यांच कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात हे वास्तव् आहे..
शेतकरी हा हिंदूस्थान च्या अर्थव्यवस्थेत भागीदार आहे त्यांच भागीदाराला तोंड दाबून मुक्याचा मार देणार असाल तर ते योग्य आहे का??
सरकार ला देशातील १४० करोड लोकांचा विचार करुन देश चालवाचा आहे पण देश सुरळीतपणे चालवताना शेतकऱ्यांचा विचार सरकारने जरूर करावा.
मी बऱ्याच शेतकऱ्यांना ३,४ महिन्या आधी व्यक्तीशा भेटलो आहे. शेतकऱ्यांची एकच मागणी होती की आम्हाला तुमचे अनुदान नको एका शेतकऱ्यांनं तर असे सांगितले होते की अनुदान हा शब्द वाटतो चांगला पण आहे ती खरी भिक. भिक देवुन शेतकऱ्यांना भिकारी बनवत आहेत का??..
भिकारी बनवण्या पेक्षा शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवा जेणेकरून शेतकरी आत्महत्या थांबून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे..
येणाऱ्या काळात शेतकरी आत्महत्या त्यांचा पोरासोराचा तळतळाट , कुटुंब उध्वस्त करायचे नसतील तर हा निर्णय मागे घेवुन शेतकऱ्यांना सरळ हाताने सरकारने मदत करुन शेतकऱ्यांचे तोंड गोड करावे…अशी मागणी लोहनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान ( भुरा) सोनवणे यांनी मीडियाद्वारे सरकार कडे केली आहे.
सरकार हे कोणाचेही असो पण शेतकरी राजाला सुखी,
समाधानी, समृद्धी पहायचे असेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या पिकाला , उत्पादनाला, योग्य भाव द्यावा… असेही त्यांनी कळकळीने शेवटी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here