September 20, 2023

बृहन्मुंबई महानगरालिकेतील जातीयवाद चव्हाट्यावर ,सेवा ज्येष्ठता ठेवली खुंटीवर ,शिंदे सरकार त्या अधिकाऱ्यांना आणतील का वठणीवर ?

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा…संपर्क : ९१५८४१७१३१

नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : तानसेन ननावरे :  बृहन्मुंबई महानगरपालिकेतील *विधी अधिकारी*(Law Officer) ह्या महत्त्वाच्या व उच्च पदावर पहिल्यांदाच बढती घेण्यास क्रमप्राप्त असणाऱ्या मागासवर्गीय महिला अधिकारीस डावलण्यात आल्याचे प्रकरण सध्या चर्चिले जात आहे.
श्रीमती संघमित्रा संदानसिंग ह्या मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या महिला अधिकारी संयुक्त कायदा अधिकारी या पदावर कार्यरत आहेत त्यांचे वरचे पद कायदा अधिकारी या रिक्त पदावर नेमणूक करावयाची होती.
श्रीमती संघमित्रा ह्या संयुक्त कायदा अधिकारी म्हणून काम करीत असल्यामुळे त्यांना पदोन्नती देऊन कायदा अधिकारी म्हणून नेमणूक करणे हे न्यायाचे व स्वाभाविक होते. शिवाय त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र त्यांना सादर करावयास सांगितले होते. अशा प्रकारे *त्या मागासवर्गीय असून सेवा जेष्ठतेत ज्येष्ठ असून देखील त्यांना डावलण्यात येऊन दुय्यम कायदा अधिकारी असलेल्या व सेवा जेष्ठतेत देखील कनिष्ठ असलेल्या खुल्या प्रवर्गातील सुनील सोनवणे या अधिकाऱ्यास संयुक्त अधिकारी पदाला जम्प करून पदोन्नती देण्यात आली.
श्रीमती संगमित्रा यांना डावलण्यात फार मोठा भ्रष्टाचार व जातीयवाद कारणीभूत ठरला आहे.
मुंबई महानगरपालिकेत विधी खाते अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील खाते आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत सर्वात भ्रष्ट खाते म्हणून संबोधले जाते. मुंबई शहराचा सत्यानाश व खेळ खंडोबा या विधी खात्याच्या भ्रष्ट अनागोंदी कारभारामुळे झाला आहे. याच विधी खात्यामुळे महानगरपालिकेतील मौल्यवान किमतीचे अनेक भूखंड गमावण्याची वेळ देखिल आली. दहिसर येथील भूखंड प्रकरणात सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा महानगरपालिकेला फटका बसला आहे. तो विधी खात्याच्या बेजबाबदार प्रवृत्तीमुळेच.
अशा या महत्त्वाच्या विधी खात्यातील सर्वोच्च असलेल्या विधी प्रमुख पदावर *सुनील सोनवणे* सारख्या अधिकाऱ्याला बसवण्यात कुणाला स्वारस्य आहे. याचा तपास एकनाथ शिंदे सरकारने केला पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील एक फार मोठा नेता जो पाच पंचविस वर्षे मंत्री देखील होता. त्या *काँग्रेसच्या नेत्याने नगरपालिकेतील एका सहआयुक्ताला हाताशी धरून सुनील सोनवणे याची नियुक्ती केली आहे.* या सुनील सोनवणे यांचा पूर्व इतिहास कलंकित असल्याचे समजते लाच लुचपत प्रतिबंधक खाते (ACB) तसेच

सक्तवसुली संचालनालय खाते (ED) येथे अनेक तक्रारी दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. श्रीमती संघमित्रा ह्या नियत वयोमानानुसार नऊ-दहा महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळात त्यांची सेवा जेष्ठता व मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना पदोन्नती देणे क्रमप्राप्त असताना देखील त्यांना डावलण्यात आले ही अत्यंत दुःखाची व शरमेची बाब आहे हा जातीयवाद व भ्रष्टाचार गाडून टाकण्यासाठी प्रखर संघर्ष आंदोलन उभे करण्याचा निर्धार *युनायटेड रिपब्लिकन पार्टीने* व्यक्त केला आहे. शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी बंंधु भगिनींना नम्र आवाहन करण्यात येत आहे. आंदोलनाला सहकार्य करत सामील व्हा, आपल्या खात्यात आपल्या विभागात मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी वर्गावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची माहिती द्या, आपण दिलेल्या माहितीच्या आधारे राज्यव्यापी लढा उभारण्यास मदत होईल.

*खूप लढलो अस्मितेसाठी आता लढू या अस्तित्वासाठी*
जय भीम जय महाराष्ट्र !

___ तानसेन ननावरे
8169218015

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.