राज्याचे मंत्री खंडोबाच्या चरणी : सर्वदूर पाऊस पडू दे ,माझा शेतकरी बांधव समाधानी होऊ दे , अजितदादा पवार यांचे देव खंडोबा रायांना साकडे
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा : संपर्क : ९१५८४१७१३१

जेजुरी : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊसाने अवकृपा केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे तर वाढत्या महागाई मुळे गरीबांना जगणे मुश्किल झाले आहे.म्हणून की काय महाराष्ट्राचे नव्यानेच झालेले उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री यांचेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी देव खंडेराया चरणी लीन झाले.
नुकतेच जेजुरी गडावर जाऊन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडेरायाच्या चरणी लीन होत मनोभावे दर्शन घेतले.यावेळी राज्यात सर्वदूर पाऊस पडू दे , माझा शेतकरी बांधव समाधानी होऊ दे , राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटू दे , उद्योगपतींनी राज्यात मोठी गुंतवणूक करू दे ,राज्यात सर्व जाती-धर्मांमध्ये सलोखा नांदू दे ,पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटू दे अशी प्रार्थना आपण खंडेराया चरणी केल्याचे अजितदादा पवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.समवेत जेजुरीचे सरपंच दादू धोंडकर व अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.