पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जनतेत नाराजी पाच दिवसांपासून रामनगर वडणेरचे रहिवाशांनी मांडले ठिय्या आंदोलन…का झोपले मालेगावचे प्रशासन ? छावा मराठा युवा संघटना तीव्र आंदोलन छेडणार _ जिवन हिरे पाटील
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या बाह्य मतदार संघातील ग्रामस्थांवर चक्क रस्ता व्हावा ह्या रास्त मागणी साठी गेल्या पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन करण्याची वेळ यावी हि अत्यंत दुर्देवी बाब म्हणता येईल. गेल्या काही महिन्यांपासून मालेगाव शहरातील आणि तालुक्यातील. रस्ता विकासाचे काम अत्यंत जोरदार व प्रभावीपणे राबविण्याचे काम चालू आहे.ह्या प्रभावी पणाने राबविल्या जाणाऱ्या कामाचे जनक पालकमंत्री असल्याचे सर्वश्रुत त्यांच्या नावाचे फलक झळकवले आहेत यावरून सांगता येईलच असे असताना मालेगाव तालुक्यातील रामनगर वडनेर च्या ग्रामस्थांवर अन्याय का ? अशी चर्चा रंगू लागली असून गाव विकासाच्या कामात तरी राजकारण नको अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली असून तरीही येथील ग्रामस्थांच्या समस्यांकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त होऊन मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय समोर गेल्या पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलनास बसले आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रामनगर वडनेर गावातील रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत २०१९ – २० मध्ये मंजूर झाला त्याप्रमाणे त्याचा कार्यादेश सुध्दा झाला.मात्र स्थानिक छोलाछाप शुल्लक समन्वयातून हे काम २०२१ पासून रखडून ठेवले आहे त्यामुळे रामनगर वासियांचे हाल तर होतातच परंतु खूपच गैरसोयीचे झाले आहे. कायदेशीर बाबी तपासूनच शासनाने कामाला मंजुरी दिली असताना त्यास अचानक आडकाठी आणंनाऱ्याना गोग्य ती समज प्रसंगी ती कार्यवाही होणे अपेक्षित असताना प्रशासन निमूट पने पाहण्याचे धाडस कोणाच्या आशीर्वादाने करते आहे ? शासन जनतेच्या सेवेसाठी की जनतेचे हाल अपेष्टा करण्या साठी असते ? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला असून येथील चांगले वातावरण कलुशित केले जात असून आपल्या न्याय हक्कासाठी रामनगर वडनेर चे ग्रामस्थ गेल्या पाच दिवसांपासून मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले आहेत .त्यांना फक्त कागदोपत्री स्तरावर आश्वासनांची खैरात दिली जात आहे. प्रांत अधिकारी , तहसीलदार ,ग्रामसडक योजनेचे अभियंता यांनी तात्काळ रस्त्याचे काम सुरू करून जनतेस न्याय द्यावा. अन्यथा छावा मराठा युवा संघटना या आंदोलनात सक्रिय होऊन तीव्र आंदोलन छेडणार असे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .निवेदनावर जिवन हिरे पाटील,नाशिक युवक जिल्हा अध्यक्ष ( ग्रा.) , पिंटू सावंत ,शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष ,राजू पाटील, शहर अध्यक्ष , ललित ह्याळीज ,नांदगाव ता.अध्यक्ष , निखिल पाटील ,नंदू सूर्यवंशी ,मालेगाव ता.अध्यक्ष आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.