गिरे तो भी टांग उपर : ईमानदारी जागृत ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी भूमि अभिलेख अधिकाऱ्यांशी विश्वास ठेवावा कसा ? सगळे काही पैसाच नसतो ! देवळा येथील अधिकाऱ्यांचा संशयास्पद प्रकार

0
118

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो.९१५८४१७१३१ 

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज नेटवर्क : भूमि अभिलेख कार्यालय महाराष्ट्र शासना मार्फत चालविले जाते जमिनीची मोजमाप करणे हे ह्या कार्यालयाचे मुख्य काम असते हे सर्वश्रुत आहेच म्हणून शेतकरी असो की सर्वसामान्य व्यक्ती असो ह्या कार्यालयावर अर्थात येथील अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर खूप प्रेम करतात म्हणून की काय ह्या कार्यालयातील कर्मचारी एकदम यहा के हम हायकमांड है ! असे समजून त्या कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या नागरिकास तुच्छ लेखून अरेराविने बोलणे, नागरिकास बसण्यास बाक किंवा चेअर न देता त्यास शिक्षा म्हणून की काय ?उभे करून ठेवणे तर येथील कर्मचारी अडांगळे हे तर कार्यालयाचे मुख्य अधीक्षक समजतात ? अशी त्यांची नागरिकांशी वागणूक म्हणजे बेशिस्तीस आमंत्रण देण्याचे कारण ठरते.त्यांचे बोलणे इतके उद्धट की भांडण केल्या शिवाय पर्याय नाही अशी वागणूक ते नागरिकांना देतात मग तो कोणीही असो माझे कोणीच काही वाकडे करणार नाही अशी खालच्या स्थराची भाषा हे अडांगळे महाशय वापरतात.याला कारण सुद्धा तसेच की गेल्या अनेक वर्षांपासून ते देवळा कार्यालयातच असल्याने माझी बदली करण्याची हिम्मत अधिकारी किंवा कोणी नेताही  करू शकत नाही असे भाकीत ते सांगत असतात.परंतु गरज नागरिकांना आणि शेतकऱ्यांना असते की आपली जमीन मोजमाप करते वेळी चुकीची मोजली जाऊ नये ह्या भावनेने नागरिक हे सगळ निमूट पणे सहन करत असतो.परंतु नाशिकचे जिल्हा अधीक्षक आणि पुणे येथील विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ह्या बातमीची दखल घेऊन ह्या अडांगळे कडे आणि कर्मचाऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासन पगारही गडगंज देते.म्हणून नागरिकांना गरजवंत समजून हे कर्मचारी अत्यंत हिन दर्जाची वागणूक देतात याला पायबंद घालण्यासाठी कर्तव्य दक्ष नाशिक जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षकांनी पाऊले उचलली पाहिजेत ही काळाची गरज असून अन्यथा भविष्यात ह्या कार्यालयातील कर्मचारी बाबत संतापाची लाट उसळी मारणार हे नक्की.कारण स्वतः महाराष्ट्र न्यूज च्या संपादकांना येथील कर्मचाऱ्यांचा आणि विशेषतः अडांगळे यांचा अनुभव आलाच परंतु उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचाही आंधळा दळततोय कुत्र पीठ खातय असा काळजाला छेद घालणारा अनुभव आलाय तेव्हा पर्दाफाश झाला की हे कर्मचारी आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या बाबतीत किती बेफिकीर ,किती निष्काळजीने किती बेजबाबदार पणाने वागतात की , ईमानदारी जागृत ठेवणाऱ्या शेतकऱ्यांशी किती बेईमानी केली जाते हे ह्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखून दिले.ते असे की,देवळा तालुक्यातील लोहणेर वसाका जवळील राहणारे पंढरीनाथ दगा अहिरे ह्या शेतकऱ्याने देवळा भूमि अभिलेख कार्यालय गाठून हद्दकायम मोजणी तातडीने करण्याची मागणी केली आणि उप अधीक्षक भूमि अभिलेख यांनी त्या शेतकऱ्याच्या मागणीस परवानगी दिली. परंतु ही परवानगी देताना त्यांनी नियमानुसार कोणत्याही शेतकऱ्याची हद्दकायम मोजणीची मागणी असो त्या मागणीस परवानगी देताना त्या शेतकऱ्याच्या  शेतात भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांनी किंवा जर कर्तव्याशी ईमान राखणारा कर्तव्य दक्ष अधिकारी असेल तर त्यांनी प्रत्यक्ष जाऊन दिशा निश्चित करून आणि तशी परिपूर्ण खात्री करूनच मगच शेजारील जमीन धारक शेतकऱ्यांना नोटीस बजावली गेली पाहिजे.हा नियम आहे आणि हे त्या भूमि अभिलेख अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे आद्य कर्तव्य सुद्धा आहे.परंतु सध्या परिस्थिती नेमकी उलटी झालीय ज्या शेतकऱ्याने काहीतरी चहा पाणी साठी संबंधितांचा खिसा गरम केला की अधिकारी चार भिंती आड उंटा वर बसून शेळ्या हुसकावण्याचे काम पद्धतशीर करतो.मग ते काम अंगाशी येईल की नाही आणि आलेच अंगाशी आपण स्वतः उपाशी मरू पण आपली बायका पोर हे उपाशी राहतील की ….? याचा विचार ते न करता नोटीस सोडून मोकळे होतात आणि मोजणी साठी रुबाब दाखवतात जसे की आम्ही तुमच्यावर ( शेतकऱ्यावर) उपकार करायला आलो असे समजतात आणि असाच प्रकार पत्रकार भारत पवार यांचेशी भूमि अभिलेख  कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला.संबंधित शेतकरी पंढरी यांनी मोजणी मागवली आम्हास आलेल्या चुकीच्या नोटीस वरून वाटले की ह्या पंढरी कडून सरकारी फी घेऊन त्या व्यतिरिक्त अधिक ओली पार्टी साठी म्हणून की काय चिरी मिरी दिली असणार आणि अधिकारी मोजणी साठी तयार झालाच जसे की पंढरी यास असे वाटू लागले की मी पंढरपूर हूनच जाऊन येतोय अशा थाटात घरी आला.आणि घडले तसेच उप अधीक्षक भूमि अभिलेख,देवळा यांनी संबंधित शेजारील शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली की दिनांक १९ / ७ / २०२३ रोजी हद्द कायम मोजणी करण्यात येणार आहे.आणि बघितले त्या नोटीस मध्ये तर चक्क दिशा चुकविलेल्या.ज्या शेतकऱ्याची जमीन उत्तरेला असेल तर त्या शेतकऱ्याच्या जमिनीची दिशा चक्क दक्षिणेला दाखवली. एक दिशा चुकली तर तीघ दिशा चुकणार हे नक्की.चुकीच्या दिशा शासकीय नोटीस मध्ये दाखुन त्या संबंधित शेतकऱ्यांना वाटप करणे हा संशयास्पद प्रकार असून या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे यासाठी आपण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांची भेट घेणारच तत्पूर्वी अधीक्षकांनी यात तातडीने लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी पत्रकार पवार यांनी केली असून चुकीच्या दिशा असल्या मुळे चक्क पत्रकार भारत पवार यांनी देवळा भूमि अभिलेख कार्यालयाशी संपर्क करून त्यांची चूक लक्षात आणून द्यावी लागली आणि मोजणी रद्द करावी लागली.जर चार भिंती आड बसून कारभार करत असतील ह्या चुका अधिकारी क्षणात करणार आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठी शेतकरी पैसा, वेळ खर्च करून , शारीरिक श्रम करून भूमि अभिलेख कार्यालयात आयुष्यभर हेलपाटे मारणार हे ह्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांना शोभते काय ? थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे की आपण काय झक मरतोय ते ? हा संताप जनक प्रकार पत्रकार यांच्या वाट्यास आला तेव्हा भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी ,अधिकारी यांच्या कामाचा पर्धाफाश झाला.त्यामुळे पत्रकार भारत पवार यांनी मोजणी तर बंद केलीच शिवाय संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार वापरून माहिती मागविण्यात आली यावेळी कर्मचारी अडांगळे यांनी वेड्याचे पांघरून घेऊन पेडे खाण्याचा प्रकार दाखवला की ही माहिती आमच्या कार्यालयात उपलब्ध नाही म्हणजे गिरे तो भी टांग उपर अशी हास्यास्पद अवस्था त्यांनी करून दाखवली. ही बाब गंभीर असून त्यांच्या ह्या चुकीच्या वागणाऱ्या पद्धतीने ईमानदार शेतकऱ्याचे वाटोळे होणार याला जबाबदार हे अधिकारी असणार का ? असा संतप्त सवाल या निमित्ताने मुख्य संपादक भारत पवार यांनी नाशिक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक यांना केला असून ह्या गंभीर बाबी बाबत आणि कर्मचारी अडांगळे यांच्या आडमुठे धोरणाबाबत जिल्हा अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालून चुकीच्या दिशा दाखवण्याचे कारण काय ? स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दिशा निश्चित का केल्या नाहीत ? अडांगळे यांच्या आडमुठे धोरणाबाबत विचारणा करून त्यांची बदली इतरत्र करण्यात यावी अन्यथा पंढरीनाथ अहिरे यांच्या मागणी नुसार नव्याने होणाऱ्या हद्दकायम मोजणी संशयास्पद असणार यात शंकाच नाही.म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या बातमीची दखल घेऊन ईमानदार शेतकऱ्यांना न्याय द्यावा.जो पर्यंत अडांगळे यांची बदली इतरत्र  केली जात नाही तो पर्यंत हद्दकायम मोजणी नव्याने करू नये किंवा त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना नव्याने नोटीस बजावण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारत पवार यांनी केली असून लवकरच जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक नाशिक यांचेशी भेटून चर्चा करणार असून याबाबत पुणे विभागीय कार्यालयाशी संपर्क करणार असल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here