September 21, 2023

अखेर महाराष्ट्र सरकारचे खाते वाटप जाहीर …वाचा सविस्तर

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी तात्काळ संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात मंत्री पदा साठी पिपासूनी चक्क कमळा कडे धाव घेत स्वतःच्या घरातच छेद घातल्याने राजकारण गढूळ झाले.त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिगज्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.पुतण्याने काकास जोराचा धक्का देत घड्याळ पळवून लावून मी राष्ट्रवादीचा सर्वेसर्वा अशी हाक देत त्या हाकेला भुजबळ चटकन धाऊन आले.त्याचबरोबर अनेक राष्ट्रवादीचे दिग्गज कमळाच्या दावणीला बांधले गेले.अर्थातच घरका भेदी लंका ढाये ही म्हण सुद्धा सार्थकी लागल्याचे दिसले.आज पर्यंत फक्त ह्या म्हणी विषयी ऐकले होते परंतु अजित पवारांनी मात्र त्या म्हणी साठी आटोकाट प्रयत्न करून मेहनत घेऊन म्हण सार्थक केली.तेव्हा पासून राज्य मंत्रिमंडळात मंत्र्यांचे खाते वाटप कधी होणार ? याकडे नेते मंडळी डोळे लाऊन बसले होते.तर खाते वाटपाबाबत मोठीच दमछाक करावी लागत होती.यासाठी अजित पवार यांनी दिल्ली वारी सुद्धा केली.आणि अखेर नवनियुक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज खाते वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने जाहीर करण्यात आली.राज्यपाल रमेश बैस यांची सही झाल्यानंतर शिंदे यांनी खाते वाटप जाहीर केली.नवीन मंत्र्यांच्या खाते वाटपा बरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये देखील फेरबदल करण्यात आले.भाजपा आणि शिवसेना यांच्या कडील काही खाती काढून राष्ट्रवादीकडे देण्यात आली आहेत.

नवनियुक्त मंत्री व त्यांचे कडील खाते …..

१) अजित पवार _ उपमुख्यमंत्री ,अर्थ आणि नियोजन 

२) संजय बनसोडे _ क्रीडा

३) अदिती तटकरे _ महिला बाल विकास मंत्रालय

४) हसन मुश्रीफ _ वैद्यकीय शिक्षण

५) अनिल पाटील _ मदत वमदत व पुनर्वसन

६) दिलीप वळसे पाटील _ सहकार

७) धनंजय मुंढे _ कृषी

८) छगन भुजबळ _ अन्न आणि नागरी पुरवठा

९) धर्मरावबाबा आत्रम _ अन्न व औषध पुरवठा.

एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार _ कृषी,मदत,आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही तीन खाती गेली आहेत.तर भाजप कडून अर्थ,सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा,क्रीडा,महिला आणि बालकल्याण ही सहा खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी लागलीच कामास सुरुवात केली.मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील ५०३ क्रमांकाच्या दालनातील कार्यालयातून कामकाज पहाणार आहेत.

 

 

 

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.