मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी किशोर पवार यांची नियुक्ती

0
113

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो. 9158417131

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  कार्य हीच ओळख हे ब्रीद घेऊन कार्य करणारे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावचे आदर्श शिक्षक किशोर ज्ञानदेव पवार यांची  मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सौंदाणे येथील चेअरमन पदी  बिनविरोध निवड झाल्याबद्दल पवार यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपण सर्वांनी प्रत्यक्ष भेटून, संदेशद्वारे, व्हाट्सअँप, एसएमएस तसेच कॉल करून शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. असेच प्रेम,साथ व आशीर्वाद असू द्या…असेही नवनियुक्त चेअरमन किशोर पवार यांनी सर्व सहकारी बांधवांना सांगितले.पतसंस्थेच्या कारभारात पारदर्शकता आणणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या निवडणूक प्रक्रियेत मतदार राजा,सभासद,संघटना जेष्ठ पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी *चेअरमन पदी* बिनविरोध संधी देऊन जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभारी आहोत.
संस्था कामकाज करतांना १०० % पारदर्शी कारभार ,सभासद हिताच्या योजना,नम्र व आदर्श सेवा यासाठी आम्ही सर्व संचालक कटीबद्ध राहू.असेही आश्वासन चेअरमन पवार यांनी दिले.
यासाठी आपल्या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन,सूचना व साथ आवश्यक राहतील अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here