मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी लि.च्या संचालक पदी किशोर पवार

0
144

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.9158417131
सौंदाने : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका प्राथ.शिक्षक सोसायटी लि.सौंदाणे येथील सोसायटीच्या संचालक पदी किशोर पवार यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली त्यामुळे पवार यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात असून त्यांच्या कार्याचे कौतुक ही केले जात आहे.
कळवण,सटाणा,मालेगाव,देवळा,नांदगाव,चांदवड कार्यक्षेत्र असलेल्या सोसायटीच्या अत्यंत अटीतटीच्या घडामोडीतून सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्याबद्दल नूतन सर्वच संचालकांचे अभिनंदन केले जात आहे.सोसायटीचे कार्य संपूर्ण राज्यात भरारी घेऊन शिक्षक सोसायटी प्रगती पथावर न्यावी अशी नवीन संचालक मंडळा कडून अपेक्षा सभासदांनी व्यक्त केल्या आहेत.
या निवड प्रक्रियेत मनाचा मोठेपणा दाखवून बिनविरोध निवड प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी माघार घेणाऱ्या सर्व उमेदवारांचा सार्थ अभिमान व मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
आपण अखंड सेवेची संधी देऊन, आपला हक्काचा माणूस म्हणून, आपली सेवा घडो. हीच प्रभू पांडुरंगा चरणी प्रार्थना.
तसेच बिनविरोध निवड प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक संघटनेचे सर्व नेते व अध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस, कार्याध्यक्ष,कोषाध्यक्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व मतदार व सभासद बंधू-भगिनींचे तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, सोसायटी हितचिंतक या सर्वाचे मनःपूर्वक आभार  संचालक किशोर यांनी या वेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here