
भारत पवार : .मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१ मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : विलास गडाख : सुप्रीम कोर्टाचा निकाल गुरुवारी लागण्याची शक्यता असून माझाच निर्णय योग्य ठरेल असे नरहरी झिरवाळ यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र्रातील सत्ता संघर्षात १६ आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड यांनी आज तसे सूचित केले आहे. दरम्यान या मुद्यावर बोलतांना माझ्या निर्णयावरचं सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब करण्याची शकयता आहे. असा विश्वास माजी उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अचानक सरकारचा पाठिंबा घेणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवले होते.यासह अन्य मुद्यांवर सर्वोच्च न्यायालय गेल्या फेब्रुवारीमध्येच वकिलांचा युक्तिवाद संपला मात्र अद्याप निर्णय लागलेला नाही. तो गुरुवारी लागण्याची शक्यता आहे.यासंदर्भात प्रातिक्रिया देताना नरहरी झिरवाळ म्हणाले की मी त्यावेळी दिलेला निर्णय हा राजकीय आकसापोटी दिलेला नव्हता.आणि याबाबत सभागृह सार्वभौम आहे.त्यावेळी मी योग्य तोच निर्णय दिला होता.त्यावेळी मी एका संवैधानिक पदावर होतो,त्यामुळे सर्वोच न्यायालय माझ्याच निर्णयावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
