
भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार नेमणे आहेत तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो 9158417131
मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल : संजय बोर्डे : मुंबई येथील अनुदत्त विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, कांदिवली पूर्व येथे माजी विद्यार्थ्यांनी शाळेत निरोप समारंभ झाल्यानंतर जवळपास तीन दशकांपासून शिकलेले विद्यार्थी एकत्र येत १ मे २०२३ रोजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी स्नेहभेट सोहळा साजरा केला. त्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आधार देऊन आज ताठ मानेने जगण्याची दिशा देणारे अनुदत्त विद्यालय, संस्थापक / प्राचार्य आणि समस्त अध्यापक वृंद यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या तीन दशकांपासून शाळेत शिकलेले माजी विद्यार्थी उपस्थित राहिले त्यातील अनेक विद्यार्थी हे आज मोठं मोठया पदांवर कार्यरत आहेत. पोलीस, वकील, डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, खेळाडू, चित्रकार, पत्रकार, व्यवसायिक असे विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे विद्यार्थी हे एकत्र येऊन विविध अनुभवांवर प्रकाशझोत टाकत मोठ्या जल्लोषात सोहळा साजरा केला.
