कामगार दिनानिमित्ताने मंत्री महोदयांच्या गावी कायद्याची पायमल्ली, पालकमंत्री दादा भुसे लावतात विकास कामांना जोर …! मालेगाव बांधकाम खात्यातील अभियंता काम करतात कमजोर ,मक्तेदार कोण अशी विचारणा करून होतात शिरजोर !! सर्वसामान्य जनतेस ह्या कामाचा घोर ,मंत्री भुसे वळवतील का ह्या अभियंत्याकडे आपली तीक्ष्ण नजर ? सवाल तर अभियंता इमानदारांनी इमान राखून इमानदारी दाखवावी _ मागणी

0
88

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.9158417131

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : भारत पवार / रामदास बच्छाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील बांधकाम खात्यातील काही अभियंत्यांची खूपच मनमानी वाढली असून खुद्द मंत्री महोदय दादा भुसे यांच्या विकास कामात संबंधित अभियंता अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले .नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मोठ्या प्रयत्नांनी जिल्ह्याच्या विकाासाठी मेहनत घेऊन मुख्यमंत्री यांचे कडून भरगोस निधी प्राप्त करून घेतला आणि जिल्हा भरात रस्त्यांच्या कामांना सुरुवात सुद्धा झाली आहे असे असले तरी पालकमंत्री यांच्याच गावी बांधकाम खात्यातील अभियंत्यांनची मुजोरी / मनमानी कारभार खूपच वाढल्याचे दिसून आले असून साईट वरती न जाता ,प्रत्यक्ष काम कोणत्या दर्जाचे सुरू आहे ? मक्तेदार  नेमके काय मटेरियल वापरतो ? मक्तेदार कोण ? याची जाणीव न ठेवता काम सुरू आहे ? याला नेमके काय म्हणावे ? अर्थातच ह्या अभियंत्यांना सर्व माहीत असतेच यांच्या परवानगीने मक्तेदार काम सुरू करत नाही हे तितकेच खरे आणि आपण कोणत्या मक्तेदारस कोणत्या रस्त्याचे काम सुरू करण्या साठी दिले हे सुद्धा चांगलेच माहीत असते. तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागातील इमानदार अभियंत्यांनी आपले इमान का गहाण ठेवले ? हेच कळेनासे झाले मंत्री महोदयांच्या गावातील कामात आणि त्यांनी आणलेल्या विकास कामांना चांगल्या दर्जाचे काम देण्यास संबंधित अभियंता जाणूनबुजून हलगर्जी पणा का करतात ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. पालक मंत्री दादासाहेब भुसे यांच्या महत प्रयत्नाने मालेगाव शहरात आणि तालुक्यात सर्वत्र रस्ता विकास कामे चालू आहेत   याबाबत निदर्शनास आलेली धक्कादायक प्रकार म्हणजे तालुक्यातील झोडगे आणि अस्ताने रस्त्याचे सुमारे २ कोटी रुपयाचे रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर चालू आहे ह्या कामाने प्रगती जरी घेतली असेल परंतु कामाचा दर्जात अधोगती घेतली आहे.दर्जा खलवला असल्याचे निदर्शनास येते सुमारे दोन कोटी रुपयाचे काम आणि ह्या कामात अक्षरशः माती वापरली जात असून हे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे .याबाबत आमचे प्रतिनिधी रामदास बच्छाव यांनी संबधित अभियंता इमानदार यांना फोन द्वारे संपर्क  साधला असता संपूर्ण कामाची खालावलेली परिस्थितीची जाणीव करून दिली असता इमानदार यांनी आपले इमान गहाण ठेवून मक्तेदार कोण आहे ? चक्क असा सवाल करून स्वतःच्या कारभाराची जाणीव इमानदार यांनी  बच्छाव यांना करून दिली. यावेळी रामदासजी बच्छाव यांनी इमानदार यांना प्रश्नांची सरबत्ती केली असता इमानदार यांची चुप्पी झाली. तर इंजिनिअर चव्हाण यांनाही बच्छाव यांनी फोन द्वारे संपर्क केला असता त्यांनी फोन घेण्यास टाळाटाळ करून परिस्थिती निभावून नेली.विशेष म्हणजे १ मे कामगार दिनानिमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र कामगारांना सुट्टी असते या दिवशी ओझर येथील अत्यंत महत्वाचा विमान बनविणाऱ्या मिग कारखान्यास म्हणजे तेथील सर्व कामगारांना,नोकरदारांना सुट्टी होती आणि या दिवशी मालेगाव तालुक्यात झोडगे _ अस्ताने रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आले होते सर्व कामगार कामावर हजर होते अशा सरकारी इमानदार व चव्हण अभियंत्यांनी या दिवशी सदर कामाकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? या दिवशी कामगारांना सुट्टी का दिली नाही ? याबाबत मक्तेदार आणि दोघा अभियंत्यांची कसून चौकशी करून त्यांना दोषी ठरवून कामगार कायद्याची पायमल्ली केली म्हणून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मीडिया द्वारे मंत्री महोदय भुसे यांचे कडे पवार आणि बच्छाव यांनी केली आहे.त्याचप्रमाणे रस्त्याचे काम करत असताना हे काम निकृष्ट दर्जाचे तर आहेच परंतु या ठिकाणी फलक ,बोर्ड लावलेला नव्हता हे विशेष तरीही इमानदार आणि चव्हाण अभियंत्यांनी या बाबत मक्तेदारास कुठल्याही प्रकारची विचारणा न करता त्यास अभय दिल्याचे दिसते.तर एकमेकात चांगल्याच टक्केवारीचे पाणी मुरल्याचे दिसत असून कामात निकृष्ट पणा जोरदार चालू आहे. इमानदारांनी इमानदारी राखून रस्त्याचा कामात चौकशी करण्याची इमानदारी दाखवावी अशी मागणी होत आहे.तर आपल्या कामात खो घालणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मक्तेदार आणि वरील दोघा अभियंत्यांवर आपली  तीक्ष्ण नजर वळवून संबंधितांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशीही मागणी केली आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here