जागतिक कामगार दिनानिमित्ताने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
70

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा .मो.9158417131

 

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : १ मे  रोजी संपूर्ण जगामध्ये जागतिक कामगार दिन साजरा केला जातो .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी
कामगाराच्या कल्याणासाठी वेगवेगळे कायदे बनवले, स्वतंत्र मजूर पक्ष काढला कामगारांच्या कामाची ८तास ड्युटी केली अशा बऱ्याच योजना बाबासाहेब आंबेडकरांनी उपयोगात आणल्या महिलांसाठी सुद्धा बाबासाहेबांनी अनेक योजना अमलात आणल्या त्यात महत्वाची योजना म्हणजे . नोकरी करत असलेल्या महिलांना प्रसूती रजा नव्हती प्रसूती रजा मंजूर करण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले.अशा   महामानवास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दामू नगर शाखा कांदिवली पूर्व मागाठाणे विधानसभा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख संजय बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन कारण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे
अंकुश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सुंदर लांडगे, बाबू काळे, अधिकार पाडमुख जनार्दन कोळे, विठ्ठल दादा, किशोर ईनकर, शाहू मस्के, महादेव तरकसे, प्रकाश साळवे सुरेश लहाने, उत्तम खोपे आपा,गंगाधर भाउ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here