ड्रायव्हरच्या हिमतीला एस टी ची साद : बस एक्सेलरेटरचे पॅडल तुटले तरीही कल्याणहून नाशिक आणली
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : कोणत्या ना कोणत्या कारणाने रस्त्यावर चालणारी लाल परी अर्थात एस टी बस चर्चेत असतेच कधी अपघाताने,तर कधी ब्रेक फेलने तर कधी चालक,वाहक यांच्या उपोषणाने तर कधी बसचे एखादे पार्ट तुटून बंद पडल्याने अशा अनेक कारणांमुळे बस चर्चेत येऊन अडचणीत येते तर चालक , वाहक यांचे बरोबर प्रवाश्यांना अडचणीत आणते.हे आपण सगळ्यांनी अनुभवले आहेच.परंतु ह्या सगळ्या अडचणीवर मात केली बस चालकाने आपल्या हिमतीने.
समजलेली हकीकत अशी की सकाळी सात वाजता मुंबई येथील कल्याण येथून अमळनेर येथे बस निघाली बस कसारा घाटात असतानाच बसचे एक्सीलेटरचे पेडल तुटले बस घाटात आणि बस मध्ये प्रवासी होणार काय ? प्रवाशांच्या मनात धास्तीने घर केले तर काही प्रवाशी चिंतेत पडले ? मात्र बस चालकाने स्वतःला सावरत हिमतीने युक्ती केली त्याने एक्सलेटर पॅडल तुटलेल्या ठिकाणी दोरी बांधून शेजारी वाहकाला बोलाऊन घेऊन त्याच्या हाती दोरी देत बस वर नियंत्रण मिळवत बस सुरळीत नाशिकच्या दिशेने निघाली .वाटेत मेकॅनिकच्या सहायाने बस दुरुस्तीचा केलेला प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरला .दुपारच्या उन्हाच्यa लाही लाही ने बस नाशिक डेपोत पोहचली.नाशिक मध्ये प्रवाशी चालकाच्या हिमतीने सुखरूप पोहचले.नाशिकहून नवीन बस बदलून वाहक अमळनेरच्या दिशेने निघाला .चालकाच्या हिमतीला बसने दिलेली साद यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.