मालेगाव तालुक्यात तुफान अवकाळी गारपीट ,कांदा पिकांचे अतोनात नुकसान : शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी

0
108

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि परिसरातील बातम्या साठी संपर्क करा : मो. ९१५८४१७१३१

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : रघुनाथजी कुवर , राज्य उपसंपादक : मालेगाव तालुक्यात काल अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे की शेतकरी कांदा व अन्य रब्बी पिकांकडे बघून खाली जर बसला तर लवकर उठणार नाही आर्थिक नुकसान खूपच झाल्याने होतेचे नव्हते झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिकच्या बाबतीत कंबरडे मोडल्याने शासनाने त्यांना दिलासा देण्याची खूपच गरज झाल्याने नुकसान झालेल्या पिकांचे रितसर पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.

मालेगाव तालुक्यात  काल झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार पावसाने बॅटिंग केल्याने सर्वत्र गारांचा थरच्या थर साचल्याने कांदा व अन्य रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांनी उधारी तर काहींनी उसनवारी करून कांदा पीक ,हरभरा , गहू आदी पिकांची लागवड केली जोमात आलेले पीक अवकाळी पावसाने त्यातच गारांचा जोरदार मारा झाल्याने हे पीक कोमात गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले असून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मोठी गरज आहे.म्हणून रितसर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी मीडिया द्वारे शासनाकडे केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here