उपसरपंच बापुराज खरे यांची तज्ञ संचालक पदी निवड : अभिनंदनाचा वर्षाव
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे. संपर्क मो.९१५८४१७१३१ ब्राह्मणगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यात नावाजलेली आणि संपूर्ण बागलाण तालुक्यात सहकार क्षेत्रात नावारूपाला आलेल्या ” सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या तज्ञ संचालक पदी बापुराज खरे यांची नियुक्ती करण्यात आली.आज सटाणा येथे संस्थेच्या कार्यालयात झालेल्या सर्व पदाधिकारी व सर्व संचालकांच्या सभेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व ब्राह्मणगाव ग्रामपालिकेचे विद्यमान उपसरपंच श्री.बापुराज खरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी ग्राहक संघाचे उपसभापती श्री.राहुलदादा सोनवणे व जेष्ठ संचालक श्री.किशोरदादा कदम यांच्या हस्ते श्री.बापुराज खरे यांची तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सटाणा ग्राहक संघाचे सभापती सौ.मंगलाताई सोनवणे, संचालिका सौ . सरला ताई वाघ ,जेष्ठ संचालक श्री. साहेबराव तात्या सोनवणे,श्री.आप्पासाहेब नंदाळे,श्री.अशोक सोनवणे,श्री.संदीप सोनवणे,श्री.कपिल सोनवणे, श्री.नितीन अमृतकार, श्री.अमित सोनवणे,श्री.सुरज सोनवणे, श्री.राहुल सोनवणे आदि सर्व संचालक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक भारतराज पवार यांनी बापूराज खरे यांचे अभिनंदन केले असून अशीच उत्तुंग भरारी घेत जा अशा शुभेच्छाही दिल्या. खरे यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
