१००व्या वर्षात पदार्पण केलेले बाबा आजही तरुणांना लाजवेल अशी शेतात कामे करतात

0
87

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नव्याने पत्रकार नियुक्ती साठी आणि आपल्या परिसरातील बातम्या,जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१ / 9158417131

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आजच्या धावपळीच्या युगात आणि महागाईच्या जमान्यात जगणे नकोसे झाले आहे त्यामुळे तरुणांच्या अंगात कुठलेही काम करण्याची हाव , उमेद , ताकद किंवा उत्साह उरला नाही.शेतीतील कामे करणे अगदी दूरच.तरुण रक्तात मरगळलेली अवस्था प्राप्त झाली आहे.त्यातच हायब्रीड खाणे म्हणजे निकस अन्न खाणे तरुण उभा कसा राहणार हा पण एक प्रश्नच आहे.शेती मालाला भाव नाही बऱ्याचदा शेतकऱ्यांनी आंदोलन केली,अगदी रस्त्यावर उतरून रस्ता सुद्धा अडवला शासनाचे लक्ष वेधले तरी शासनाने शेतकऱ्यांच्या पिकास भाव न देता ” भाव खाऊ” लागले शेतकरी विशेषतः तरुण शेतकरी सरकारच्या भूमिकेकडे अपेक्षेने पाहू लागले.पण नाही कांदा तर आजही कवडीमोल भावाने खरेदी केला जातोय.मग तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावच्या गाव विकायला काढले तरी शासनास त्याचे काही घेणे देणे नाही किंवा माळवाडी सारख्या गावात खासदार येऊन शेतकऱ्यांशी हितगुज करून फक्त आश्वासनाच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या खिशात काहीच न देता शेतकऱ्यांना झुलवत ठेवणे आणि शेतकऱ्यांनी कुठ पर्यंत विश्वास ठेवणे हे सुद्धा शेतकऱ्यांनी विचारपूर्वक विचार करणे हिताचे ठरणार आहे.सांगायचा हेतू असा कितीही मोठा नेता खेड्यात आणा काहीच हाती लागणार नाही शेवटी सरकार जेव्हा करेल तेव्हाच ते करते.नेते फक्त आशासणाची खैरात देऊन निघून जातात आपण त्यांच्यावर किती आणि कुठवर विश्वास ठेवणार याचे भान आपण विचार पुर्वक करणे उगीच आशेवर भरकटत जाऊ नये.शेतीचे पीक मातीमोल जातेय त्यामुळे शेतकरी उदास तर झाला आहेच तरुण शेतकरी मात्र दिशाहीन होतोय हे तितकेच खरे.तरी सुद्धा याला अपवाद देवळा तालुक्यातील दहिवड येथील वयोवृद्ध शेतकरी आहे.गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी असे चित्र सध्या सर्वत्र झाले आहे.शंकर शिवराम पवार हे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्या शेतकऱ्याने अर्थात त्या आजोबाने वयाची ९९ वर्ष पूर्ण करून १०० व्या वर्षात शानदार पदार्पण केले.आणि आजच्या तरुणांना लाजवेल अशी शेतात कामे आजही करतांना दिसत आहेत.अगदी त्यांनी रविवार दिनांक २/४/२०२३ रोजी १०० व्या वर्षात पदार्पण केले.तरी सुद्धा त्यांनी घरच्या शेतात पाणी भरण्याचे काम हाती घेतले शेतात पाणी ( बारे) देण्याचे काम अगदी न थकता सहजतेने करताना आपणास वरील चित्रात दिसत आहेत.बाबांचे वय जरी झाले तरी सुद्धा कामात तरुण दिसत आहेत.अर्थात १०० व्या वर्षाचे तरुण शंकर पवार आपणास आजही मोठ्या उमेदीने शेतात बारे देताना दिसतात उमिद आहे फक्त शासनाने आपली वचन पूर्ती करून शेती पिकास योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना मोठी उभारी देण्याची.शेतकरी ना उमेद होऊ न देण्याची. एवढेच यानिमित्ताने.

लेखक :

___ भारत पवार , मुख्य संपादक ,कसमादे टाइम्स

महाराष्ट्र न्यूज .मो.९१५८४१७१३१

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here