आर.पी.आय.जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे तर जिल्हा उपाध्यक्ष पदी उपसरपंच बापुराज खरे यांची फेर निवड
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : नव्याने पत्रकार नियुक्ती करीता तसेच जाहिराती व आपल्या परिसरातील बातम्या साठी संपर्क करा मो.९१५८४१७१३१ ब्राह्मणगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हा प्रमुख मा.प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव येथील ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारतभाऊ जगताप यांच्याहस्ते बागलाण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या ज्या पदाधिकाऱ्यांनी आरपीआयच्या वाढीसाठी योगदान दिले आहे अशा जुन्या पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले असून नुकतेच त्यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. तालुक्यात रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे किशोर सोनवणे यांची पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदावर ,ब्राह्मणगाव ग्रामपालिकेचे उपसरपंच बापुराज खरे यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर तसेच जायखेडा गावचे सामाजिक नेते बापू मोरे यांची तालुका अध्यक्ष या पदावर फेरनिवड करण्यात आली,तसेच करंजाड गावचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वणीस यांची तालुका कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
रिपब्लिकन पक्षाच्या मालेगाव येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पदग्रहन कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण जिल्हाप्रमुख भारत जगताप यांच्याहस्ते या मान्यवरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
वरील पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्ती मुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील आर पी आय कार्यकर्त्यात आणि पदाधिकाऱ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी बागलाण मधील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
