March 22, 2023

शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मरण .. शासन आखते आश्वासनांचे धोरण !

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा .मो.९१५८४१७१३१                                              देवळा / मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सत्य आहे म्हणून कटू लागणार अशी अवस्था सर्वसामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची झाली आहे हि अवस्था कोणी केली हे सांगण्याची गरज नाही तरीसुद्धा याचा विचार जनतेने करायला हवा. २०१३ मध्ये कांदा 700/- रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि २०२३ ला काल कांदा 700/- रुपये प्रति क्विंटल विकला आहे… फरक इतकाच आहे २०१३ मध्ये डिएपी ५६०/- रुपया ला एक बॅग होती आज १९००/- रुपया ला एक बॅग आहे, लागवड मजुरी 5000/- रुपये एकर होती आता 11000/- रुपये एकर आहे मजूर तेव्हा ४००/- रुपया ला गॅस भरत होता आज आज १२००/- रुपये ला झालाय…२०१३ ला ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर मशिन ६,००,०००/- रुपये सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर ११,००,०००/- रुपये लागत आहे तेव्हा मिळणारी १५,०००/- रुपये ची बैलजोडी आज ५५,०००+ रुपये हजाराची झाली, एरव्ही मोदी निवडून येण्याच्या आधी ५०,०००/- रुपये ला मिळणारी मोटासायकल जिच्यात लोक ६०/- रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिर्वाहासाठी दोन पैसे कमवत होते आज तिचं गाडी १,१०,०००/- रुपये वर नेऊन ठेवली शेट नी आणि तिचे पेट्रोल ११०/- रुपये वर गेलं… साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतकी जुजबी कर वसुली का देशात? एकंदरीत पहिल्या गेलं तर शेतकरी २५/- रुपये किलो ने गहू व्यापाऱ्याला विकत आहे तोच गहू दुकानदार ५०/- रुपये ने जनतेला विकत आहे असा धान्याचा काळा बाजार जोरात सुरू आहे.२०१३ ला सोयाबीन ६०००/- रुपये क्विंटल होती तरी तेल 60 रुपये होते आज पण सोयाबीन ५०००/- रुपये क्विंटल आहेत आणि तैल १४५/- रुपये लिटर काय चालले आहे देशात! त्या तुलनेत शेती मालाचा भाव का नाही वाढत आहे? शेताला लागणारा तर सर्वच खर्च दुप्पट झाला आहे.*

*सर्व ठिक आहे. ज्या प्रमाणे शेतातील लागणाऱ्या सर्व वस्तू चे भाव ज्या तुलनेत वाढले आहे त्याच प्रमाणे शेतातून निघणाऱ्या मालाचे भाव सरकारी यंत्रणेने दिले तर बरं होईल, किमान शेतकरी जगू शकेल! नाही तर पेपरवर आणि गूगल वर दाखवावे लागेल शेतकरी नावाची एक अशा पद्धतीची जमात भारतात अस्तित्वात होती.*

*आज खऱ्या अर्थाने समाजकारण चे समर्थन करण्याची गरज निर्माण झाली आहे… भरमसाट कर गोळा करून महागाई वाढली आहे. त्यातून निर्माण होणार सर्व पैसा शहरात लावला जात आहे … परंतु आज ही ६०% जनता खेड्यात आहे ६०% अर्थ व्यवस्था ही कृषी आधारित आहे त्याच्या शिवाय शक्य नाही… शहरात बिना कामाचे मेट्रो, मोनो, बुलेट, ट्रेन, करोडो रुपयांची संसद, पुतळे, मंदिरे उभरण्यापेक्षा, देण्यापेक्षा खेड्यात चांगल्या दर्जाची शाळा, दवाखाने, शेती आधारित नवीन बियाणे – प्रक्रिया उद्योग – निर्दोष विक्री व्यवस्था उभारणे गरजेचं आहेत.*

*खेड्यातील लोक ज्या सहजतेने आपल्या एकूण उत्पन्नाच्या भागातून दानधर्म, मदत करतात त्यात कित्येक मंदिर उभे राहू शकतात. परंतु खेड्यातील लोक ना जिवंतपणी मारून, खोट्या अफवा पसरवून सोशल मीडिया वापर करून जात धर्म, शेजारील देशाचा उल्लेख करून निव्वळ देश विकल्या जात आहे … नक्की आपण आपल्या पुढील येणाऱ्या पिढीला काय देत आहोत, काय देणे लागतो आणि काय देऊ शकतो, आपले आजी आजोबा जितकी संपत्ती आपल्याला देऊन गेले त्या बदल्यात पुढच्या पिढीला उत्तम सदृढ जगण्या योग्य समाज दिला तरी खूप बरे होईल. बघा विचार करा!🙏*

More Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.