मालेगाव भडकले पोलिसांची डोकेदुखी वाढली ,ना.दादा भुसेंच्या समर्थकांनी खा.संजय राऊत यांचा पुतळा जाळला तर राऊत म्हणाले मी मालेगावी येणार कोण काय करते बघू , जनतेत घबराहटीचे वातावरण
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : मो. ९१५८४१७१३१

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : काल खा.संजय राऊत यांनी ना.दादा भुसे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्या बद्दल मालेगाव येथील भुसे समर्थकांत जोरदार संताप व्यक्त केला गेला.त्यामुळे मालेगाव येथे तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भुसे शेकडो समर्थक काही कळण्याच्या आत एकत्र येत घोषणा बाजी करत आणि हातात खा.संजय राऊत यांचा पुतळा घेत प्रचंड गर्दीत येथील मोसम पुलावर पुतळा जाळून संताप व्यक्त करण्यात आला यावेळी संपूर्ण वाहतूक चक्काजाम झाली होती त्यामुळे पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली.खा.संजय राऊत यांनी तालुक्यातील दाभाडी गिरणा सहकारी साखर कारखाना बाबतीत ना.भुसे यांच्या विरुद्ध काही अपशब्द बोलल्याने काल दुपारी भुसे यांचे समर्थक भुसे यांच्या कार्यालयात जमून राऊत यांच्या विरोधात घोषणा देत आणि हाती राऊत यांचा पुतळा घेत सटाणा रोड पासून तर मोसम पुलाकडे रवाना होत मोसम पुलावर पुतळा पेटून जोरदार घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला तर पुतळा जळत असताना पोलिसांनी अनेकवेळा विझविण्याचा प्रयत्न केला शेवटी पाणी ओतून पुतळा विझवला गेला मात्र कार्यकर्त्यांचा राग विझवला गेला नाही.आमच्या नादी लागाल तर आम्ही सोडणार नाही असे भुसे समर्थकांनी आपल्या भाषणातून राग प्रगट करीत सांगितले तर मी दि. २४ तारखे पासून मालेगावी आहे बघू कोण काय करते ते ? असे प्रती आवाहन खा.राऊत यांनी यावेळी दिले त्यामुळे मालेगाव येथे तणावपूर्ण शांतता पसरली असून संघर्षाची ठिणगी पडते की काय? अशा विचाराने येथील जनता चिंतेत पडली असून पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.मात्र मालेगाव शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणा कडून शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता येथील पोलीस घेत आहेत.पोलीस ॲक्शन मोड वरती असून जनतेने घाबरून न जाता भय मुक्त सण साजरे करून शांतता कायम ठेवावी असेही आवाहन केले गेले आहे.