बळीराजा भडकला : माळवाडीगाव विकण्याचा ठराव झाला , मंत्र्यांचे बोलबचन बळीराजाचे मरण ,कांदा कवडीमोल झाला फडणवीसांच्या गाडीवर फेकला तर केंद्रीय राज्यमंत्री पवार यांना घेराव

0
83

भारत पवार : मुख्य संपादक ,संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

देवळा / अमरावती : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क कांद्याचे भाव गडगडल्याने राज्यभरातील बळीराजांचा भावनांचा उद्रेक झाला त्यामुळे सर्वत्र केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दौऱ्यावर असताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना घेराव घालून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.तर देवळा तालुक्यातील माळवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत चक्क माळवाडी आणि फुले माळवाडी हे गाव संतापाच्या भरात विकण्यास काढण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केल्याने तालुक्यात तरुण शेतकऱ्यांचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत.दुसरी कडे मात्र अमरावती जिल्ह्याच्या विविध कार्यक्रमांचे निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर कांदे फेकण्याचा प्रयत्न करत फडणवीस यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. अनेक विध कार्यक्रम आटोपून कृषी महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जात असताना कार्यकर्त्यांनी कांदा फेकण्याचा कार्यक्रम केला.यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कांद्याचे भाव एकदमच कमी झाल्यामुळे शासनाने कांदाच कवडीमोल करून टाकल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरंगू लागल्याने मात्र त्यांचा माथाच भडकला केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांना घेराव घालून बळीराजांनी प्रश्नांचा मारा केला. दरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले.

अमरावती शहरातील सायन्स कोर्स मैदानात कृषी महोत्सवाच् आयोजन करण्यात आले आहे.फडणवीस यांना अडवून शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून गडगडलेल्या भावा संदर्भात विचारणा केल्यावर याचे उत्तर मी माझ्या भाषणातून देईन असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत वेळ निभावून नेल्याने शेतकऱ्यांत अधिकच नाराजी पसरली.आम्ही शेतकऱ्यांच्या फायद्या साठी निर्णय घेणार असेही फडणवीस यांनी सांगून वेळ मारून नेली.

माळवाडी गाव संतापाच्या भरात शेतकऱ्यांनी विकण्यास काढले 

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी आणि फुले माळवाडी गावातील तरुण शेतकऱ्यांनी आणि महिलांनी एकत्र येत संताप व्यक्त करत शासनाचा निषेध म्हणून माळवाडी गाव विकण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून ठराव राज्य शासन आणि केंद्र शासन यांचे कडे पाठविनार असल्याचे उपस्थित नाराज बळीराजांनी संगितले.माळवाडी आणि फुले माळवाडी गावाचे प्रमुख पीक म्हणून कांदा लागवड केली जाते.अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून कांदा पिकास पसंती देत कांदा लागवड केली आहे त्यातच कांद्याचे भाव एकदमच कमी झाल्याने सर्वत्र शेतकऱ्यांचा आक्रोश पहावयास मिळतो आहे यावर मंत्री काहीच बोलत नसल्याने नुसतेच दौरे करणे,जिवाची मजा करणे यातच सरकार मश्गुल असून शेतकऱ्यांसाठी फक्त बोलबचन करत असतात अंमलबजावणी साठी मात्र वेळ काढू धोरण राबवतात त्यामुळे शेतकऱ्यांचे मरण जवळच आणतात असे म्हणत अनेकांनी संताप व्यक्त केला.माळवाडी येथील सभामंडपात तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत आपले विचार व्यक्त केले यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.गाव विकण्याचा ठराव संमत झाल्यानंतर या ठरावावर अविनाश बागुल,अमोल बागुल,संदेश सोनवणे,प्रवीण बागुल, अक्षय शेवाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here